समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, छत्रपती संभाजीनगर येथील चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 21:11 IST2023-05-10T21:09:30+5:302023-05-10T21:11:02+5:30
हा अपघात चॅनेल नंबर ३४६.८ दरम्यान घडला.

समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, छत्रपती संभाजीनगर येथील चार जण जखमी
मलकापूर पांग्रा - समृद्धी महामार्गावर १० मे रोजी दुपारी ४:४५ वाजता भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात चॅनेल नंबर ३४६.८ दरम्यान घडला.
यामध्ये कारचालक दिनकर राजाराम जरारे, वैभवी दिनकर जरारे, संजीवनी दिनकर जरारे, निशा दिनकर जरारे (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) हे जखमी झाले आहेत. जखमींना लगतच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातग्रस्त कार ही क्रेनच्या सहाय्याने नंतर बाजूला घेऊन मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. सोबतच सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण बकाल, नायक पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल काळूसे, संदीप किरके व राज्य रस्ते विकास महामंडळाचे वाहन चालक गणेश चाटे यांनी वाहतूक सुरळीत केली.
समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात एमएच-०२-जीई-४७९७ क्रमांकाची कार मलकापूर पांग्रा लगतच्या पट्ट्यात वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील उपरोक्त चौघे जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसातील समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतील हा तिसरा अपघात आहे.