ढोकी येथे चार दरोडेखोर जेरबंद

By Admin | Updated: September 5, 2014 00:55 IST2014-09-05T00:49:53+5:302014-09-05T00:55:48+5:30

उस्मानाबाद : दरोड्याच्या तयारी असलेल्या चार दरोडेखोरांना ढोकी पोलिसांनी जेरबंद केले़ ही कारवाई गुरूवारी पहाटेच्या सुमारास ढोकी येथील पेट्रोलपंपानजीक करण्यात आली़

Four dacoits martyr in Dhoki | ढोकी येथे चार दरोडेखोर जेरबंद

ढोकी येथे चार दरोडेखोर जेरबंद


उस्मानाबाद : दरोड्याच्या तयारी असलेल्या चार दरोडेखोरांना ढोकी पोलिसांनी जेरबंद केले़ ही कारवाई गुरूवारी पहाटेच्या सुमारास ढोकी येथील पेट्रोलपंपानजीक करण्यात आली़
पोलिसांनी सांगितले की, ढोकी येथील पेट्रोल पंप चौक येथील टेलीफोन कार्यालयाजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या शिरात शेख, पिंटू उर्फ रवी रेणके, दिपक उर्फ सारंग पवार, शकिल शेख (सर्व राक़ळंब) या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले़ त्यांच्याकडून दोन बांबूच्या काठ्या, एक प्लास्टिक पाईप, लोखंडी कत्ती, कटावणी, १ लाख, ५० हजार ४६० रूपये, एक कार (क्ऱएम़एच़१४- ३१७७) मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी हेकॉ राजेंद्र दत्तात्रय कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि शिंदे हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Four dacoits martyr in Dhoki