शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शपथपत्रासाठी पंधरवड्याची मुभा

By admin | Updated: August 20, 2014 00:57 IST

औरंगाबाद : सलीम अली सरोवराच्या सौंदर्यीकरणप्रकरणी दाखल अवमान याचिकेत मनपाला शपथपत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन आठवड्यांची मुभा दिली आहे.

औरंगाबाद : सलीम अली सरोवराच्या सौंदर्यीकरणप्रकरणी दाखल अवमान याचिकेत मनपाला शपथपत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन आठवड्यांची मुभा दिली आहे. मंगळवारी सुनावणीच्या वेळी मनपाने शपथपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. खंडपीठाने मनपाची ही मागणी मान्य करीत वरील मुभा दिली. न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत मनपाच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले होते, तसेच आयुक्तांना अवमान नोटीसही बजावली होती. डॉ. सलीम अली सरोवर संवर्धन समितीतर्फे समन्वयक अरविंद पुजारी यांनी यासंबंधी जनहित याचिका दाखल केली आहे. याआधी सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका संवर्धन समितीने गतवर्षी अ‍ॅड. महेश भारस्वाडकर यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने २ जानेवारी २०१४ रोजी जैवविविधता कमिटी नेमली. सरोवरातील जैवविविधतेच्या संवर्धनासंदर्भात शिफारशींसह दोन महिन्यांत राज्य शासनास अहवाल सादर करावा, असे आदेश या कमिटीला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे सरोवरातील जैवविविधतेला बाधा येईल असे कोणतेही काम तेथे करूनये, असे अंतरिम आदेशही खंडपीठाने आॅक्टोबर २०१३ मध्ये मनपाला दिले होते. हे आदेश आजही लागू आहेत, तरीही मनपाने २ जुलै रोजी या सरोवराचे उद्घाटन केले. त्यामुळे सरोवर संवर्धन समितीने या प्रकरणी अवमान याचिका दाखल केली. त्यावर न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. व्ही. एल. आंचलिया यांनी मनपा आयुक्तांना अवमान नोटीस बजावली होती. आज मंगळवारी न्या. बोर्डे आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मनपाने शपथपत्रासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. महेश भारस्वाडकर यांनी तर मनपाच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली.