परभणीत पाऊस

By Admin | Updated: May 18, 2014 00:39 IST2014-05-18T00:36:12+5:302014-05-18T00:39:15+5:30

परभणी : शनिवारी शहर व परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या़ पावसामुळे वातावरणातील उकाडा वाढला होता़

Forecast rain | परभणीत पाऊस

परभणीत पाऊस

परभणी : शनिवारी शहर व परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या़ पावसामुळे वातावरणातील उकाडा वाढला होता़ यावर्षी जवळपास वर्षभर पाऊस झाला़ उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्याला झोडपले़ एप्रिल महिन्यात ऊन तापत असतानाच या महिन्यातही पावसाने हजेरी लावली़ मे महिना म्हणजे उन्हाळ्यातील सर्वात कडक उन्हाचा महिना असतो़ परंतु, या महिन्यातही पाऊस झाला़ मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे़ दुपारपर्यंत कडक ऊन पडते़ सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होते आणि पाऊसही पडतो़ अशा विचित्र वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे़ त्याच प्रमाणे शेतीसाठी देखील हा पाऊस नुकसान दायक ठरत आहे़ आगामी काही दिवसात मान्सूनची प्रतीक्षा असताना अवकाळी पाऊस होत असल्याने पावसाळ्यात पाऊसमान कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Forecast rain