फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रमाचा बोजवारा

By Admin | Updated: December 18, 2014 00:38 IST2014-12-18T00:03:06+5:302014-12-18T00:38:20+5:30

बीड : जिल्ह्यात फ्लोराईडचा विळखा वाढता असताना नियंत्रण कार्यक्रमाचा मात्र मार्गदर्शक सूचनांअभावी पुरता फज्जा उडाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या ६५ लाखांपैकी केवळ १५ लाख रुपये खर्च झाले आहेत.

Flawless control program deletion | फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रमाचा बोजवारा

फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रमाचा बोजवारा


बीड : जिल्ह्यात फ्लोराईडचा विळखा वाढता असताना नियंत्रण कार्यक्रमाचा मात्र मार्गदर्शक सूचनांअभावी पुरता फज्जा उडाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या ६५ लाखांपैकी केवळ १५ लाख रुपये खर्च झाले आहेत. सर्वे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १८ गावांत तब्बल ३६७ रुग्ण फ्लोराईडबाधित आढळले होते. फ्लोराईच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे २०१३ मध्ये बीडला फ्लोराईडबाधित जाहीर केले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने फ्लोराईडला अटकाव करण्यासाठी ६५ लाख रुपयांचा कार्यक्रम आखला. मात्र, त्यानंतर फ्लोराईड नियंत्रण कसे करायचे? याच्या कुठल्याच सूचना प्राप्त झाल्या नाहीत. बीडसाठी फ्लोराईड हा आजार तसा नवीनच आहे. त्यावर नेमके काय उपचार करायचे? रुग्ण शोधायचे कसे? कायमस्वरुपी नियंत्रणासाठी कुठले उपाय करायचे? याची स्थानिक आरोग्य विभागालाच माहिती नाही. त्यामुळे फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रम केवळ नावालाच उरला आहे.
एकीकडे फ्लोराईडने हातपाय पसरलेले असताना दुसरीकडे आरोग्य विभाग सूस्त आहे. त्यामुळे फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
निधी अखर्चित का?
फ्लोराईड रोखण्यासाठी आलेल्या ६० लाखांपैकी १५ लाख सर्वेक्षण, किरकोळ साहित्य खरेदीवर खर्च झाले आहेत. उर्वरित ४० लाख रुपये उपलब्ध आहेत;परंतु ते खर्च करायचे कसे? याबाबतच्या नेमका सूचनाच नाहीत. प्रशिक्षण, सर्वे व उपाय यावर हा निधी खर्च करता येईल का? यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी दिली. वरिष्ठांकडून मार्गदर्शन आल्यानंतर निधी खर्चाबाबत पाऊले उचलू, असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)

Web Title: Flawless control program deletion