शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी तयार केले पक्ष्यांसाठी पाणवटे

By admin | Updated: May 13, 2014 01:15 IST

अंबाजोगाई:सध्या कडक ऊन पडत असल्याने पक्ष्यांना अन्न पाणी मिळावे. यासाठी बौद्ध धम्म संस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पाणवटे व धान्य यांची सोय केली आहे.

 अंबाजोगाई:सध्या कडक ऊन पडत असल्याने पक्ष्यांना अन्न पाणी मिळावे. यासाठी बौद्ध धम्म संस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पाणवटे व धान्य यांची सोय केली आहे. या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील बोधीवृक्षावर तसेच परिसरातील, अंगणातील झाडांना विद्यार्थ्यांनी पाण्यासाठी विविध प्रकारच्या छोट्या कुंड्या, तसेच धान्यासाठी वेगवेगळे पात्र तयार करून टांगले आहेत. त्यात विद्यार्थी नित्यनियमाने पाणी व धान्य टाकतात. घरातील विविध टाकाऊ वस्तूंपासून पाण्याच्या कुंड्या, तसेच धान्यासाठी टांगणीचे पात्र तयार करण्यात आले. या कार्यशाळेत पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी अ‍ॅड. संदीप थोरात यांनी तथागत बुद्धांचे पक्षी प्रेम या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध कथा सांगितला. पक्षांचे पर्यावरणातील स्थान व मानवी जीवनाला होणारी मदत यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यासाठी पहाग सोनवणे, सुशांत ओगले, तुषार जोगदंड, बुद्धभूषण सरवदे, प्रतीक तरकसे, तन्मय साळवे, उज्ज्वल वडमारे, राज गायकवाड, प्रतीक सरवदे, कनिष्क ओगले, अस्मिता बनसोडे, श्रेया कसबे, वैष्णवी ओगले, ऋतिका वेडे, विदिशा लोणारे, मयुरी कांबळे, श्रेया सरवदे, पूर्वा तरकसे, अजिंक्य शिंदे आदींनी पुढाकार घेतला. पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी झाडांवर पाणी व धान्य असलेल्या कुंड्या टांगल्याने परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे चेहरेही फुलले आहेत. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्कार केंद्राचे अ‍ॅड. संदीप थोरात, प्रा. कीर्तिराज लोणारे, विवेक घोबाळे, बाळासाहेब खांडके, दीपक गायकवाड, सुहास सरवदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. किलबिलाटही वाढला ज्याठिकाणी पक्ष्यांसाठी झाडाला लटकवलेले पाणवठे आणि केलेली धान्याची सोय यामुळे या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट, चिवचिवाट वाढलेला दिसून येत आहे. परिसरात पक्षी येत असल्याने परिसर प्रसन्न होत आहे. विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात या पक्ष्यांची काळजी घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (वार्ताहर)