शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाच टक्के औरंगाबादकरांना काचबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:25 IST

डोळ्याच्या आतमध्ये वाढलेला दाब म्हणजे काचबिंदू (ग्लॉकोमा) होण्याची धोक्याची घंटा असते. त्या दाबामुळे दृष्टी चेतातंतू दाबले जाऊन आतील बाजूला इजा होते. काचबिंदूचा आजार नियंत्रित करता येत असला तरी ५ टक्के औरंगाबादकर या आजाराने ग्रासले आहेत. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येण्याची भीती असते, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.

ठळक मुद्देजागतिक काचबिंदू सप्ताह : चोरपावलांनी येणारा आजार, उपचाराअभावी अंधत्वांचा धोका

औरंगाबाद : डोळ्याच्या आतमध्ये वाढलेला दाब म्हणजे काचबिंदू (ग्लॉकोमा) होण्याची धोक्याची घंटा असते. त्या दाबामुळे दृष्टी चेतातंतू दाबले जाऊन आतील बाजूला इजा होते. काचबिंदूचा आजार नियंत्रित करता येत असला तरी ५ टक्के औरंगाबादकर या आजाराने ग्रासले आहेत. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येण्याची भीती असते, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.१० ते १६ मार्चदरम्यान जागतिक काचबिंदू सप्ताह पाळण्यात येत आहे. जनजागृतीमुळे मोतीबिंदूविषयी सर्वसामान्यांना माहिती आहे. डोळ्यात दिसणाऱ्या डागामुळे मोतीबिंदू लगेच लक्षात येतो; परंतु काचबिंदू सहज लक्षात येत नाही. काचबिंदू हा आजार चोरपावलांनी येणारा आजार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे डोळ्यातील नसांवर (आॅप्टिक नर्व्ह) दुष्परिणाम होऊन दृष्टी कमी होते. उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास कायमची दृष्टी जाण्याचा धोका असतो. काचबिंदू हा कधी कळत नाही. वयाच्या ३५ वर्षांपासून वर्षातून एकदा डोळ्यांची नियमित तपासणी करावी, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले.आजार लक्षात येत नाहीमोतीबिंदू हा लगेच लक्षात येतो; परंतु काचबिंदू लगेच लक्षात येत नाही. हा आजार हळूहळू वाढतो. यात डोळ्यावर ताण वाढतो. यावर औषधोपचार के ला जातो; परंतु औषधोपचाराने फरक पडला नाही तर शस्त्रक्रियेची वेळ येते, असे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. गोल्हाईत यांनी सांगितले.चाळिशीनंतर अधिक धोकाकाचबिंदूच्या रुग्णांचे प्रमाण चार ते पाच टक्के आहे. वयाच्या चाळिशीनंतर हा आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. वेळेवर उपचाराअभावी दृष्टी जाण्याचा धोका असतो, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ आणि औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटनेचे कोषाध्यक्ष केदार नेमीवंत यांनी दिली.हळूहळू अंधत्वकाचबिंदूमुळे हळूहळू अंधत्व वाढत जाते. घरातील सदस्यांना काचबिंदू असेल तर कुटुंबातील सदस्यांनीही वेळीच खबरादारी घेतली पाहिजे. त्याबरोबर मधुमेह रुग्णांनाही काचबिंदू होण्याची अधिक शक्यता असते. कमी वयातही काचबिंदू आढळत आहे, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. सोनाली भांगे यांनी सांगितले.काचबिंदूची लक्षणेडोळे दुखणे, डोळे लाल होणे, अंधूक दिसणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, दिव्याभोवती वर्तुळे दिसणे.काचबिंदू कोणाला होऊ शकतो?- कुटुंबात कोणाला काचबिंदू झालेला असल्यास अनुवंशिकतेमुळे शक्यता.- ४० वर्षांवरील व्यक्तींना.- मधुमेह, रुक्तदाबाचे रुग्ण.- डोळ्यांना दुखापत झाल्यास.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य