शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पाच वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीत ४० टक्के जिवंतसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 8:35 PM

जलसंपदा : १६ मध्यम प्रकल्पांत २० टक्क्यांपर्यंत, ९३ लघु प्रकल्पांत १३ टक्के पाणी  

औरंगाबाद : येथील उद्योग, व्यापार आणि सामान्यजणांची जीवनवाहिनी असलेल्या नाथसागरात (जायकवाडी धरण) यंदा मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच जुलैच्या सुरुवातीला ४० टक्के जिवंत जलसाठा आहे. 

गेल्या वर्षी खरीप आणि रबी हंमागाची सात आवर्तने देऊनही धरणात जिवंत साठ्याचे प्रमाण मोठे आहे. ही मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब आहे. जायकवाडी धरणाला बांधून ४४ वर्षांचा काळ लोटला आहे. या काळात सर्वाधिक वेळा दरवाजांचे आॅपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग गेल्यावर्षी विविध वेळा करण्यात आला. 

उन्हाळ्यात खरीप हंगामासाठी ४ आवर्तने (पाणी सोडणे) देण्यात आली. रबी हंगामासाठी ३ आवर्तने देण्यात आली. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यामुळे  पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. परभणी जिल्ह्यातील शाखा कालवा येथून २०८ कि.मी. अंतरावर असून, तिथपर्यंत धरणातून पाणी सोडण्यात आले. कृषीसाठी हे वर्ष ही चांगले ठरण्याची अपेक्षा आहे.

४६ दिवस दरवाजे उघडले गेल्या पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे ४६ दिवस खुले करण्यात आले. धरणाला एकूण २७ दरवाजे असून, १ ते ९ क्रमांकाचे दरवाजे उघडलेले नव्हते. १० ते २७ क्रमांकांपर्यंतचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणांच्या ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड पहिल्यांदाच झाला आहे. आजवर ५ ते १० वेळा ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड आहे. १०० अधिक वेळा ‘गेट आॅपरेशन’ मागच्या पावसाळ्यात झाले.

२०१६ मध्ये धरण होते मृतसाठ्यात 

पाच वर्षांतील लघु व मध्यम प्रकल्पांची स्थितीजिल्ह्यात १६ मध्यम आणि ९३ लघु प्रकल्प आहेत.यामध्ये ३९३ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे.  

मध्यम प्रकल्प मागील पाचपैकी तीन वर्षे २०१५ ते २०१८ पर्यंत मृतसाठ्यात होते. २०१९ साली या प्रकल्पांत ५० टक्क्यांपर्यंत पाणी आले. काही प्रकल्प भरले. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये २० टक्के पाणी आहे. लघु प्रकल्पांत २०१५ ते २०१७ शून्य टक्के पाणी होते. २०१७ साली ४ टक्के, तर २०१८ साली ७ टक्के पाणी होते. २०१९ साली दीड टक्का, तर २०२० सालच्या जूनपर्यंत १३ टक्के पाणी लघु प्रकल्पांत आहे. 

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा