शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात रस्ता गेला वाहून

By admin | Updated: June 22, 2015 00:19 IST

येणेगूर : उमरगा तालुक्यातील आष्टा शिवारात १२ जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे आष्टा-अचलेर रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे़

येणेगूर : उमरगा तालुक्यातील आष्टा शिवारात १२ जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे आष्टा-अचलेर रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे़ त्यामुळे मागील आठवड्यापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, शेतकऱ्यांसह नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे़मागील काही वर्षापूर्वी आष्टा- अचलेर या रस्त्याचे काम करण्यात आले होते़ आष्टा परिसरात १२ जून रोजी दमदार पाऊस झाला़ रस्त्याच्या पूर्वेकडील भागात या पावसाचे पाणी साठले होते़ हे पाणी पश्चिमेकडील भागाने ओव्हरफ्लो होवून वाहून गेले़ पाण्याच्या प्रवाहात या रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे़ ही घटना घडून नऊ दिवसांचा कालावधी लोटला तरी बांधकाम विभागाने पुलाच्या दुरूस्तीबाबत कोणत्याच हलचाली केलेल्या नाहीत़ या पुलाची दुरूस्ती व्हावी, यासाठी आष्टा येथील ओंकारप्पा सुलतानपुरे, उपसरपंच गंगाधर बलसुरे यांच्यासह ग्रामस्थांनी माहिती दिली होती़ मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे़ काही ठिकाणी केवळ पांढरे दगड टाकून देण्यात आले आहेत़ रस्ताच खराब झाल्याने बससेवाही बंद झाली आहे़ या भागातील प्रवाशांचेही हाल होत आहेत़ (वार्ताहर)