शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

पहिले पाढे पंचावन्न

By admin | Updated: September 12, 2014 00:05 IST

हिंगोली : जिल्ह्यातील पाच ठिकाणी असलेली कृषी चिकित्सालयाची जमीन निव्वळ देखभाल व दुरूस्तीअभावी पडीक होत चालली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील पाच ठिकाणी असलेली कृषी चिकित्सालयाची जमीन निव्वळ देखभाल व दुरूस्तीअभावी पडीक होत चालली आहे. अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणामुळे काही ठिकाणी ती गिळंकृत करण्याचाही अनेकांनी प्रयत्न चालविला. त्यातच पिकांना तणाने वेढा दिला असताना अळीनेही पानाची चाळणी केली. गत अनुभव पाहाता यंदाही परिस्थिती बदलली नसल्याने ‘पहिले पाढे पंचावन्न’ म्हणायची वेळ आली आहे.गतवर्षी ३०० एकरात २८६ क्विंटल उत्पादनाची नामुष्की कृषी विभागावर ओढवली. त्याचा धडा कृषी विभागाने घेतलेला नाही. कोणत्याही जमिनीवर सोयाबीन वगळत इतर पिकांची पेरणी केलेली नाही. नवीन पिकांची पेरणी, प्रयोग, प्रात्यक्षिके कोसोमैल दूर आहेत. एकदा पेरून काढणीलाच अधिकारी त्या जमिनीवर जातात. दरम्यान कुंपनच शेत खात असल्याने यंदाही दुरवस्था कायम राहण्याची शक्यता आहे. आजघडीला पिकांना तणाने वेढा दिला. कोळपणी, निंदणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याने पिकांबरोबर तण वाढले. त्यावरही अळीने हल्ला केल्याने पानाची चाळणी झाली. इतरांना फवारणीवर फवारणी करण्याचा सल्ला देणाऱ्या विभागाला फवारणीचे शहाणपण सुचले नाही. आहे ते पिकही मोकाट जनावरांसाठी नंदनवन ठरत आहे. हिंगोलीतील सर्व जनावरे चाऱ्यासाठी भटकंती करण्याची गरज नाही. हे ओळखूनही शहरातील काही लोकांनी जाणूनबूजून जनावरे मोकाट सोडली आहेत. इतर ठिकाणीही तीच अवस्था असल्याचे पहावयास मिळते. कित्येक वर्षांपासून साधे कुंपनही विभागाला घालता आलेले नाही. दरवर्षी कोट्यावधी रूपये इतर योजनांसाठी खर्च होत असताना कायमस्वरूपी जमिनीसाठी कोणत्याही प्रकारचे संरक्षण केलेले नाही. सर्वच जमिनीला कोणीही वाली नसल्यासारखी अवस्था झाल्याने दुरवस्था कायम आहे. अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्यामुळे या जमिनीला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (समाप्त)