विनामास्क फिरणाऱ्यांना ३८ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:06+5:302021-02-05T04:14:06+5:30
दिवसभरात ८३२ जणांना लसीकरण औरंगाबाद : शहरात गुरुवारी दिवसभरात ८३२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आरोग्य केंद्र सिडको ...

विनामास्क फिरणाऱ्यांना ३८ हजारांचा दंड
दिवसभरात ८३२ जणांना लसीकरण
औरंगाबाद : शहरात गुरुवारी दिवसभरात ८३२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आरोग्य केंद्र सिडको एन-८ येथे ८५, धूत हॉस्पिटल येथे -८९, कमलनयन बजाज हॉस्पिटल- ७०, एमजीएम हॉस्पिटल- १४५, हेडगेवार हॉस्पिटल - ७४, घाटी रुग्णालय- ५४, आयएमए- १२४, सीएसएमएसएस- १५२, सिग्मा हॉस्पिटल येथे ३९ जणांना लसीकरण केले.
दोन अनधिकृत नळ तोडले
औरंगाबाद : मालमत्ता कर वसुली टास्क फोर्सने दिवसभरात सात लाख २६ हजार ४३३ रुपयांचा कर वसूल केला. दोन ठिकाणी कर न भरणाऱ्यांच्या नळजोडण्या कापण्यात आल्या.
महापालिकेतर्फे १२२ प्रवाशांची चाचणी
औरंगाबाद : महापालिकेने दिवसभरात १२२ प्रवाशांची चाचणी केली. रेल्वेस्थानक येथे ८१, तर विमानतळावर ४१ जणांचे स्राव घेण्यात आले. जाधववाडी येथे २० जणांची व छावणी आठवडी बाजारात चाैघांची कोरोना चाचणी केली.