शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग्सवरील कारवाईला सापडेना मुहूर्त !

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध होर्डींग लावून चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

सोमनाथ खताळ , बीडशहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध होर्डींग लावून चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यासाठी कुठलाही परवाना न घेता सर्रास होर्डींगद्वारे ‘फोकस’मध्ये येण्यासाठी धडपड सुरू आहे. हे नियमबाह्य असले तरी यावर कारवाई करण्यास पालिकेने हात आखडता घेतला असून आतापर्यंत एकही कारवाई झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.निवडणूक प्रचारासाठी लावलेली अवैध होर्डींग काढण्यासाठी प्रत्येक पालिकेने एक मोहीम राबवून ते हटवावेत असे न्यायालयाने आदेश दिले होते. हे अवैध होर्डींग काढण्याची मोहीम राबविण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने ३० सप्टेंबरला प्रत्येक पालिकेला दिले होते. पालिकेने याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. आजही अनेक ठिकाणी होर्डींग लावल्याचे दिसून येत असून यावर कारवाई करण्यासाठी पालिका का धजत नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.पालिकेने होर्र्डींग लावण्यासाठी सातारा येथील राहुल कदम यांना ५ लाख ८० हजार रूपये एवढी रक्कम घेऊन ठेका दिला आहे. याची मुदत ३१ मार्च २०१५ पर्यंत असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात ना या ठेकेदाराचे ऐकले जाते ना पालिकेचे. सर्रास आपलीच ‘दादा’गिरी करीत सार्वजनिक तसेच वाहतुकीस, रस्त्यांवर अवैध होर्डींग लावले जात आहेत. त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.पथक सुस्तबीड पालिकेच्या वतीने अवैध होर्डींगवर कारवाया करण्यासाठी तीन झोनमध्ये तीन स्वच्छता निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलेले आहे.यामध्ये स्वच्छता निरीक्षक युवराज कदम, तिडके, जोगदंड यांचा समावेश आहे. मात्र कदम म्हणाले शहरात कोठेच अवैध होर्डींग नाही. जे आहेत ते ठेकेदारामार्फत लावले गेलेले आहेत. पालिकेच्या रस्त्यावरील होर्डींगवर आम्ही कारवाया करतो. त्यात काय विशेष हे तर रूटींगचे काम आहे़होर्डिंग्स हटवणारशहरातील सर्वच होर्डींग हटल्याशिवाय दुसरे होर्डींग लावायला परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.४बीड शहरात पालिकेच्या वतीने २४ ठिकाणी होर्डींग लावण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र हे ठिकाण सोडून आपला मनमानी कारभार चालवत राजकीय नेते व स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते समजणारे होर्डींग लावून ‘फोकस’मध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत.