शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर चारा छावणी सुरू

By admin | Updated: December 7, 2015 00:58 IST

पारगाव : पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासह या भागात पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाल्याने परिसरातील सव्वाशेवर जनावरे बीड जिल्ह्यात नेण्यात आली होती.

पारगाव : पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासह या भागात पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाल्याने परिसरातील सव्वाशेवर जनावरे बीड जिल्ह्यात नेण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या भागात दोन संस्थांच्या छावण्यांना मंजुरी दिल्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. यातील एका छावणीचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. चार टंचाईवर मात करण्यासाठी वाशी तालुक्यातील विविध ठिकाणच्या बारा संस्थांनी चारा छावणीसाठीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केले होते. यातील काहींमध्ये त्रुटी आढळून आल्या. तर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते. यात पारगाव सर्कलमधील दोन प्रस्तावांचाही समावेश होता. मात्र, एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने जनावरांचे स्थलांतर कण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. दरम्यान, दीपशोभा सेवाभावी संस्थेच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांना मान्यता दिल्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी पारगाव येथील खंडोबा मंदिराच्या मागे या छावणीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जि. प. चे माजी सदस्य महादेव आखाडे, माजी सरपंच डी. एन. मोटे, डॉ. शेखर कोकणे, डॉ. एस.डी. कुलकर्णी यांच्यासह छावणीसाठी पुढाकार घेतलेले बाबा हारे, बाबासाहेब गाढवे, प्रकाश मोेटे, विकास तळेकर, अशोक जाधव, लक्ष्मीकांत आटुळे, लहुदास चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी व पशुपालक आपल्या पशुधनासह उपस्थित होते.(वार्ताहर)