अखेर बसडेपोसाठी जागा देण्यास एसटी महामंडळ तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:12+5:302021-02-05T04:14:12+5:30

मुंबईत पालकमंत्री, परिवहन मंत्री यांच्या बैठकीत बसडेपोसाठी मनपाला जागा देण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्र्यांनी माहिती दिल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ...

Finally, the ST Corporation is ready to provide space for the bus depot | अखेर बसडेपोसाठी जागा देण्यास एसटी महामंडळ तयार

अखेर बसडेपोसाठी जागा देण्यास एसटी महामंडळ तयार

मुंबईत पालकमंत्री, परिवहन मंत्री यांच्या बैठकीत बसडेपोसाठी मनपाला जागा देण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्र्यांनी माहिती दिल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. मनपा एसटीचे विकास शुल्क माफ करेल. त्या मोबदल्यात महामंडळ बसडेपोची जागा नाममात्र दरात पालिकेला देईल, असे मुंबईतील बैठकीत ठरल्याचे प्रशासकांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बससेवा मनपाने सुरू केली. मात्र, बसडेपोसाठी पालिकेकडे जागा नव्हती. रेल्वेस्टेशन व मुकुंदवाडी येथील जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली होती. मध्यवर्ती बसस्थानक नव्याने बांधण्यासह सिडकोत बसपोर्ट एसटी महामंडळ बांधणार आहे. बसपोर्टच्या बांधकामासाठी एसटीला दीड कोटी रुपये विकास शुल्क मनपाला भरावा लागेल. विकास शुल्कात सूट देण्याच्या मोबदल्यात एसटीने शहर बसडेपोसाठी जागा द्यावी, असा प्रस्ताव मनपाने महामंडळाला दिला होता.

Web Title: Finally, the ST Corporation is ready to provide space for the bus depot