अखेर परभणीत चारा छावणीला मंजुरी

By Admin | Updated: May 17, 2016 00:09 IST2016-05-17T00:06:17+5:302016-05-17T00:09:42+5:30

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ मे रोजी जिल्ह्यातील पहिल्याच चारा छावणीला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे़

Finally, the Parbhani fodder camp was approved | अखेर परभणीत चारा छावणीला मंजुरी

अखेर परभणीत चारा छावणीला मंजुरी

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ मे रोजी जिल्ह्यातील पहिल्याच चारा छावणीला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे़ गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे ही चारा छावणी सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे़
परभणी जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी चारा छावण्या सुरू करणे गरजेचे आहे़, असा अहवाल जिल्हा पशूसंवर्धन विभागाने मार्च महिन्यातच दिला होता़ जिल्ह्यामध्ये ३९ मंडळ कार्यालये आहेत़ त्यापैकी ३० मंडळ कार्यालयात चारा उपलब्ध नसल्याचे या कार्यालयाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने साखर कारखाने, सेवाभावी संस्थांना चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले होते़ परंतु, तब्बल दीड महिन्यापर्यंत प्रशासनाकडे एकही प्रस्ताव आला नाही़ परिणामी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम राहिला़ मागील आठवड्यात राणीसावरगाव येथील एका संस्थेने चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता़
हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला़ त्यानुसार १६ मे रोजी विभागीय आयुक्तांनी राणीसावरगाव येथील संगमेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला चारा छावणी सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे़ २० आॅगस्ट २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्थीनुसार ही मंजुरी देण्यात आली आहे़ एका चारा छावणीत किमान ५०० ते ३००० जनावरांच्या चाऱ्यांच्या सुविधा उपलब्ध होऊ शकते़ या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे राणीसावरगाव परिसरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Finally, the Parbhani fodder camp was approved