शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

नूतन इमारतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 22, 2014 00:11 IST

जालना : शहरातील महात्मा फुले मार्केटच्या नवीन संकुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यास विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली.

जालना : शहरातील महात्मा फुले मार्केटच्या नवीन संकुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यास विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली असून ही संचिका आता मंत्रालयात शासनाच्या विचाराधीन गेली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सार्वजनिक खाजगी भागधारक या तत्त्वावर या संकुलाच्या नूतन इमारतीचे काम व्हावे, यासाठी जालना नगरपालिकेने एक आराखडा तयार केला होता. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे गेला. गेल्या अनेक दिवसांपासून या आराखड्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. जुनी इमारत पाडण्यात आल्याने तेथील व्यापाऱ्यांना इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले असून परिणामी, व्यापाऱ्यांना त्याचा आर्थिक फटकाही बसलेला आहे. या ठिकाणी नवीन संकुल बनविण्याबाबत पालिकेला काही जणांच्या रोषालाही सामोरे जावे लागलेले आहे. दरम्यान, बीओटी तत्त्वावर नूतन संकुलाचे काम व्हावे, अशा मागणीनेही जोर धरला होता. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी संकुलाचे काम सार्वजनिक खाजगी भागधारक या तत्त्वावर व्हावे, यासाठीचा पालिकेने तयार केलेला प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. आता विभागीय आयुक्तांकडून हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रस्तावाची संचिका मंत्रालयात गेल्याच्या माहितीला दुजोरा दर्शविला. ही संचिका शासनाच्या विचाराधीन असून कोणत्या पद्धतीने काम व्हावे, यासाठीचे मार्गदर्शन मिळणार आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे प्रश्नमहात्मा फुले मार्केटमधील संकुलाची इमारत जीर्ण झाल्याने सुमारे नऊ वर्षांपूर्वी ही इमारत पाडण्यात आली होती. मात्र तेथे नवीन इमारत तयार करण्याच्या कामास अनेक अडथळे येत गेल्याने हे काम अद्यापही झालेले नाही. पंधरा दिवसांपूर्वी आ. कैलास गोरंट्याल यांनी सदर काम तातडीने व्हावे, यासाठी आपण मंत्रालयीन स्तरावरून प्रयत्नशील असल्याचे सांगितले होेते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून नूतन संकुलाच्या कामाचा आराखडा मुंबई येथे मंत्रालयात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.