शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळेचे वर्ग मराठी शाळेत भरू द्या

By admin | Updated: May 15, 2014 00:27 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या जवाहर कॉलनीतील शाळेच्या काही खोल्या श्री साईनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित किडस् प्राईड इंग्लिश स्कूलसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी ठेवला आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या जवाहर कॉलनीतील शाळेच्या काही खोल्या श्री साईनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित किडस् प्राईड इंग्लिश स्कूलसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी ठेवला आहे. २० मेच्या सभेमध्ये या ठरावावर चर्चा होणार आहे. एकीकडे मराठीच्या नावाने गावभर टेंभा मिरविला जातो आणि दुसरीकडे पालिकेच्या शाळेची इंग्रजी व मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची सुधारणा करण्याऐवजी त्या शाळा खाजगी संस्थेला भाड्याने देण्याचे प्रस्ताव आणले जात आहेत. या शाळेची फी अत्यंत अल्प आहे. शाळा मध्यमवर्गीयांसाठी कार्यरत आहे. सदरील संस्था दहावीपर्यंत तुकड्या वाढविण्याच्या विचारात आहे. शाळा सामाजिक कार्य करीत आहे. शाळेला स्वत:ची जागा कमी पडते आहे. मनपाची शाळा सुटल्यानंतर दुपारच्या सत्रात काही खोल्या संबंधित संस्थेला देणे आवश्यक आहे, असे कुलकर्णी यांनी प्रस्तावात म्हटले आहे. टी. व्ही. सेंटर येथील प्रस्तावित व्यापारी संकुलाला छत्रपती संभाजीराजे मार्केट व क्रीडा संकुल असे नाव देण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता वॉर्ड ‘ब’ व ‘क’ यांनी ठेवला आहे. प्रस्तावात प्रशासनाने म्हटले आहे की, एन-१० येथील आरक्षित जागेवर क्रीडा व व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्या कॉम्प्लेक्सला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचे मनपाच्या विचाराधीन आहे. मुख्य लेखाधिकार्‍यांनी मनपात २००५ नंतर सेवेत आलेल्या व पुढे येणार्‍या कर्मचार्‍यांना नवीन पारिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. वॉर्ड अधिकारी या पदांवर स्वच्छता निरीक्षकांना पदोन्नती देणे, तेजस्विनी मुळे, सिद्धार्थ कदम, कार्तिक शिरोडकर, मधू भंडारकर, आनंद थोरात, स्नेहा ढेपे या खेळाडूंचा सत्कार करण्याचा प्रस्ताव पंकज भारसाखळे यांनी ठेवला आहे. तसेच १२४ कर्मचारी भरतीला स्थगिती देऊन दैनिक वेतनावरील कर्मचार्‍यांना मनपा सेवेत नियुक्त करण्याचा प्रस्ताव सभेसमोर आहे.