शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

आकडे टाकून होतोय झगमगाट

By admin | Updated: September 26, 2014 01:54 IST

राजेश खराडे, बीड गणेश उत्सव व नवरात्रोत्सवाच्या दरम्यान शहरातील मंडळाकडून वीज चोरी केल्याने महावितरण कंपनीला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

राजेश खराडे, बीडगणेश उत्सव व नवरात्रोत्सवाच्या दरम्यान शहरातील मंडळाकडून वीज चोरी केल्याने महावितरण कंपनीला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंडळाकडून आकर्षक रोषणाई करण्यावर भर दिला जातो. यासाठी मंडळाकडून अधिकृतपणे वीज घेणे आवश्यक असते. असे कनेक्शन देताना बील वसूल करण्याच्या दृष्टीने महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक असते. यंदा शहरात ५९ मंडळांनी नवरात्रोत्सवाची स्थापना केली आहे. यापैकी फक्त ४ मंडळांनी महावितरण कंपनीकडे नोंदणी केली असून अनामत रक्कम भरणा केली आहे. शहरातील उर्वरीत ५५ मंडळे ही अनाधिकृतपणे विजेचा वापर करीत असल्याने महामंडळाला या अतिरिक्त वीज बीलाचा फटका सहन करावा लागत आहे.या सार्वजनिक उपक्रमाच्या दरम्यान अतिरीक्त वीज वापराचा फटका प्रत्यक्ष महावितरण कंपनीला सहन करावा लागत आहे. सार्वजनिक उत्सवात मंडळाच्या विद्युत वापराच्या अनुषंगाने महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम जमा करणे हे बंधनकारक आहे. शहरातील खंडेश्वरी येथे दोन व इतर ठिकाणी सिंगल फेजचे दोन कनेक्शन अधिकृतपणे घेतले आहे. उर्वरीत मंडळांनी मात्र महावितरण कंपनी येथे नाव नोंदणी केलेली नाही. शहरातील मंडळाकडून वीज चोरी केल्याने महावितरणाला लाखो रुपयाचा चुना लागत आहे. मंडळांना या सार्वजनिक उत्सवाच्या कालावधीत वीज दरात सवलत दिली जाते. मात्र शहरातील मंडळाकडून या सवलीतीचा उपभोग घेतला नाही.वीज चोरी करणाऱ्या मंडळावर त्वरीत कारवाई करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.