शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पंधराशे वाहक पुन्हा येणार सेवेत

By admin | Updated: April 18, 2016 01:30 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळातील ११,९८४ निलंबित वाहकांना सेवेत परत घेण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली आहे.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळातील ११,९८४ निलंबित वाहकांना सेवेत परत घेण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील १,५२१ वाहकांना संधी मिळणार असून, काही शर्तींवर त्यांना परत सेवेत घेतले जाणार आहे. परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेने राज्यभरातील निलंबित वाहकांना दिलासा मिळाला आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अपहाराच्या आरोपानंतर ११,९८४ वाहकांना एस. टी. महामंडळाने निलंबित केले आहे. २००५ पासूनची ही प्रकरणे असून, एस. टी. महामंडळाच्या स्तरावर कार्यवाहीधीन आहेत. या प्रकरणांमध्ये ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची ७,७९० प्रकरणे प्रलंबित आहेत. तर शिक्षा करण्यात आलेल्या वाहकांची २,८७३ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयाने त्यामधील १,१२० प्रकरणांत शिक्षेस स्थगिती दिलेली आहे.वाहकांच्या अपहारप्रकरणी एस. टी. महामंडळातर्फे शिक्षा देण्यात आल्यानंतर या शिक्षेच्या आदेशाविरुद्ध संंबंधित वाहकांकडून कामगार न्यायालयात अथवा औद्योगिक न्यायालयात दाद मागण्यात येते. त्यामुळे अशा वाहकांच्या न्यायालयीन प्रकरणात एस. टी. महामंडळास न्यायालयीन प्रक्रियेतील तसेच वकिलांच्या सेवामूल्यांपोटी आर्थिक भार सोसावा लागतो. शिवाय वाहकाच्या निलंबनापोटी द्यावयाच्या आर्थिक प्रयोजनामुळेही महामंडळास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच बराचसा कालावधीही त्यात जातो.अपहार प्रकरणांमध्ये वाहकाचा न्यायालयीन प्रकरणी होणारा खर्च, कालापव्यय, मानसिक ताण कमी होण्यासाठी, तसेच या सगळ्यांमुळे कुटुंबियांना होणारा मानसिक, आर्थिक त्रास विचारात घेऊन वाहकांची अपहार प्रकरणे निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अटी व शर्तीकाही अटी व शर्र्तींवर ही प्रकरणे निकाली काढण्याचा राज्य परिवहन संचालक मंडळातर्फे निर्णय घेण्यात आलेला आहे. कार्यवाहीधीन ११,९८४ वाहकांना अपहारप्रकरणी महामंडळातर्फे सहानुभूतीपूर्वक विचार करून कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत पुनर्नेमणूक देण्यात येईल. त्यासाठी राज्य परिवहन संचालक मंडळासमोर प्रस्ताव सादर करून महामंडळाच्या संचालक मंडळातर्फे वाहकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यात मराठवाड्यातील १,५२१ वाहकांचा समावेश राहणार आहे.परिपत्रकानंतर अंमलबजावणीसद्य:स्थितीत विभागामध्ये वाहकांची संख्या अपुरी आहे. निलंबित वाहकांना पुन्हा सेवेत घेण्यासंदर्भात परिपत्रक येणे अपेक्षित आहे. परिपत्रक प्राप्त होताच त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल.- एस. एस. रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, एस. टी. महामंडळ