शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: June 24, 2014 00:27 IST

ईट : गारपीटग्रस्तांना शासनाने आचारसंहितेच्या कालावधीत नुकसानभरपाई जाहीर केली़

ईट : गारपीटग्रस्तांना शासनाने आचारसंहितेच्या कालावधीत नुकसानभरपाई जाहीर केली़ डीसीसी बँकेत याद्यानिहाय लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली असतानाही अद्यापपर्यंत ईट (ता़भूम) परिसरातील सहा गावातील शेतकऱ्यांना मदतीचा छदाम न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे़ डीसीसीचे अधिकारी कर्मचारी कमी असल्याचा कांगावा करीत असून, या सुलतानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़रबी हंगामामध्ये पिके हातातोंडाशी आलेली असताना अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले़ महसूल विभागाच्या वतीने पंचनामे झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असूनही विशेष बाब म्हणून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर करण्यात आले. सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या पटीत रबी हंगामातील पीक पाहणीनुसार रक्कमही तहसील कार्यालयामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आली.ईट शाखेंतर्गत असलेल्या गावांपैकी पांढरेवाडी, पखरुड, नागेवाडी, निपाणी, माळेवाडी, लांजेश्वर या सहा गावच्या शेतकऱ्यांना गारपिटीने झालेल्या नुकसानीचे अद्याप वाटप झाले नाही. याबाबत शाखाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सरसकट अनुदानाचे वाटप सुरु आहे. काही गावच्या गारपिटीच्या रक्कमेचेही वाटप झाले आहे. मोठी सभासद संख्या, कमी कर्मचारी वर्ग व आॅनलाईन पद्धत असल्याने व त्याचा स्पीड कमी असल्याने या वाटपास उशीर होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.दरम्यान, रबी हंगामातील पिकाचे गारपिटीने झालेले नुकसानभरपाई तात्काळ वाटप केल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीस याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे़ त्यामुळे बँकेने तात्काळ मदतीच्या निधीचे वाटप करावे, अशी मागणी उमाचीवाडी येथील उपसरपंच सुभाष शेळके यांनी केली आहे.