शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:51 IST

तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पामधील पूरपाणी सुकड नाल्यात टाकावे या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारपासून (दि.२७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

सटाणा : तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पामधील पूरपाणी सुकड नाल्यात टाकावे या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारपासून (दि.२७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.  दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी उपोषणकर्त्यांना सकाळी कार्यालयाच्या आवारात मंडप टाकण्यास मज्जाव करून उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तणाव निर्माण झाल्याने अधिकाºयांना माघार घ्यावी लागली.  पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने वनोली, औंदाणे, तरसाळी, सटाणा परिसरातील शेती पाण्याअभावी संकटात सापडली आहे. शेतीबरोबरच शेतशिवारात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पतून वाहून जाणारे पूरपाणी सुकडनाल्यात टाकावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उदासीन दिसून येत आहेत. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारपासून (दि. २७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर प्रहारचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे.  उपोषणकर्त्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तुषार खैरनार, पंचायत समितीचे माजी सभापती चिला निकम, सुधाकर पाटील, महेंद्र खैरनार, दीपक रौंदळ, हेमंत निकम, नीलेश निकम, महेश निकम, शरद चव्हाण, भालचंद्र अहिरे, मयूर निकम, कपिल सोनवणे, दौलत निकम, प्रवीण पवार, कैलास निकम यांचा समावेश आहे. वीरगाव लाभक्षेत्रातील शेतकरी राकेश देवरे, उद्धव देवरे, शिवाजी देवरे आदी शेतकºयांनी पूरपाणी टाकण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. उपोषणकर्त्या शेतकºयांची मागणी दसाणे लघुप्रकल्प अंतर्गत असलेल्या वीरगाव फड कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील असल्याने हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे जलसंपदा विभागच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले .शाब्दिक चकमकसकाळी उपोषणकर्ते खैरनार यांनी आवारात मंडप टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी मंडप टाकण्यास विरोध केला. यावेळी उपोषणकर्ते व अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अधिकाºयांना अखेर नमते घ्यावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणी