शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गायरानसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: August 6, 2014 02:26 IST

कडा : आष्टी तालुक्यातील ४५ गावातील गायरानधारक शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.

कडा : आष्टी तालुक्यातील ४५ गावातील गायरानधारक शेतकऱ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांकडे अद्यापही तहसील प्रशासनाने लक्ष न दिल्याने उपोषणकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.आष्टी तालुक्यातील धामणगाव, सुर्डी, करेवाडी, सांगवी, वडगाव, दादेगाव, लोणी, चोभा, पारूडी, निमगाव, धिर्डी, पाटसरा, घोंगडेवाडी, मांडवा, कानडी, बोरोडी, फातेवडगाव, पिंपरखेड, वाकी आदी ४५ गावातील शेतकरी गेल्या ३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून गायरान जमीन कसत आहेत. तालुक्यातील जवळपास ८०० शेतकऱ्यांकडे सध्या गायरान जमिनीचा ताबा आहे. काही शेतकऱ्यांची आता दुसरी पिढी गायरान जमीन कसू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेने शेतकरी विविध पीक गायरान जमिनीत घेऊन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. असे असले तरी अद्यापही या गायरान जमिनीचे मालकी हक्कात कसणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव लागलेले नाही. सातबारा आपल्या नावे करावा यासाठी गायरानधारकांनी अनेकदा रास्तारोको, उपोषण आदी आंदोलन केले आहे. मात्र यानंतरही गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे होत नसल्याने शेतकऱ्यांतून आता संताप व्यक्त केला जात आहे. आष्टी तालुक्यातील अनेक भूमिहीन, दलित, आदीवासी, भटके, विमुक्त समाजाकडे या गायरान जमीनीचा ताबा आहे. यामुळे या वंचित घटकांना आतापर्यंत आपला उदरनिर्वाह करणे सोयीचे झाले आहे. मात्र आता गायरान जमिनी आपल्याकडून सरकार काढून घेते की काय अशी भावना शेतकऱ्यांत बळावली असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी सांगितले. या गायरान जमिनी शेतकऱ्यांनाच मिळाव्यात यासाठी सोमवारपासून आष्टी येथील तहसील कार्यालयासमोर गायरानधारकांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात ग्यानबा साळवे, भानुदास गायकवाड, सुनील अडागळे, अशोक गायकवाड, दगडू काळे, महेश भोसले, रघुनाथ वाघमारे, संगीता भोसले, रावसाहेब खंडागळे, दादा खंडागळे, मतीन चव्हाण, विश्वनाथ बर्डे, बापू खुडे, दत्तात्रय थोरात यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.या उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. मात्र अद्यापही तहसील प्रशासनाने या आंदोलकांकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. तहसील प्रशासन गायरान धारकांचा प्रश्न सोडवित नसल्याने हे उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असल्याचे यशवंत खंडागळे यांनी सांगितले. (वार्ताहर)