शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी शेत तेथे शेततळे-मुख्यमंत्री

By admin | Updated: September 2, 2015 23:34 IST

बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. पाणी, चारा व रोजगार उपलब्ध करून दुष्काळावर मात करण्यात येईल,

बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. पाणी, चारा व रोजगार उपलब्ध करून दुष्काळावर मात करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेत तेथे शेततळे करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी दुष्काळग्रस्त बीडकरांना दिलासा दिला.बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांशी थेट संवादही साधला. रात्री त्यांचा ताफा बीडमध्ये आला. विश्रामगृहात अल्पशा विश्रांतीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. रजनी पाटील, खा. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. विनायक मेटे, आ. लक्ष्मण पवार, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे यांची उपस्थिती होती. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक अनिल पारसकर, सीईओ नामदेव ननावरे, अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी आमदारांनी आपापल्या भागातील दुष्काळी परिस्थिती मांडली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यातील चार जिल्ह्यावर कोसळलेले संकट मोठे आहे. संकटाचे रूपांतर संधीत करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील. अत्यल्प पाऊस असल्यामुळे खरीपाची पिके वाया गेली आहेत. दुष्काळ असल्यामुळे मागेल त्याला काम दिले जाईल. सिंचनाची रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामाचा वेग दुपटीने वाढला पाहिजे, असे त्यांनी बजावले. (प्रतिनिधी)