शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दाडी मारल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

जालना: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत.

जालना: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत. यंदा चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झालेली आहे. पेरणीसाठी सर्व तयारी करून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. आणखी आठ दिवस पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने बाजारपेठेवर त्याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. मंगळवारी मात्र, कमालीचा शुकशुकाट दिसून आला.नवीन मोंढ्यात मागील आठ दिवसापासून मालाची आवक कमालीची घटली असल्याचे येथील काही व्यापाऱ्यांनी सांगितले.बाजारपेठेत सध्या गहू, ज्वारी, हरभरा आदी मालाचीच आवक आहे. लोकवन गव्हाची आवक दररोज २०४ ्िक्वंटल असून १४०० ते १५८६ आहेत. ज्वारी ३०० ते ४०० क्विंटल असून भाव ११०० ते २७०० रूपये आहेत. बाजरी ४० क्विंटल आवक असून भाव १३०० ते १४०० आहेत. हरभरा २४७ क्विंटल आवक असून दर १८००ते २३८१ रूपये आहेत. सोयाबीन ८९ क्विंटल आवक असून भाव ३८०० ते ३९०० आहे.सध्या लिंबोळीचा हंगाम सुरू असतानाही आवक कमी आहे. सध्या लिंबोळीची आवक दररोज ७८ क्विंटल असून भाव ६०० ते ७५० रूपये आहे.मक्याची आवक दररोज ३०० पोते इतकी असून शंभर रूपयाची तेजी आल्यानंतर भाव ११७५ ते १३५० रूपये प्रतिक्विंटल आहे. साबुदाण्याच्या दरात १०० रूपयांची तेजी आली असून भाव ६००० ते ६८०० रूपये प्रतिक्विंटल आहे. साखरेच्या दरात थोडी तेजी आल्यानंतर भाव ३१०० ते ३२०० रूपये प्रतिक्ंिवटल आहेत. सर्व प्रकारच्या तेलामध्ये १ ते २ रूपयाची वाढ झाली आहे. दरम्यान, विविध मालांच्या दरात वाढ होत असल्यामुळे त्याची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे. (प्रतिनिधी)जनावरांच्या बाजारात मोठी गर्दीजालन्यात दर मंगळवारी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारात मात्र गर्दी दिसून आली. परिसरातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी आणली होती. बाजारात जनावरे खरेदी करणाऱ्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. पाऊस न पडल्याने जनावरांच्या किंमती नियमित भावापेक्षा कमी होतात. हीच बाब हेरून परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. जनावरे पाहून दर ठरविले जातात. या बाजारात गाय, बैल, म्हैस, बकऱ्या विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र, अपेक्षित किंमत न आल्याने काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे परत नेली.