शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमणास मज्जाव केल्याने कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:24 IST

या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर: मालकीच्या मोकळ्या भूखंडावर दादागिरी करून अतिक्रमण करण्यास मज्जाव केल्याने एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी सिडको एन-६ येथील संभाजी कॉलनी येथे आज दुपारी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आजोबा आणि नातू यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

रमेश पाडसवान हे आपल्या कुटुंबासह सिडको एन-६ मधील संभाजी कॉलनी येथे राहतात. त्यांचे किराणा दुकान आहे. घराच्या समोरच एक मोकळा भूखंड पाडसवान कुटुंबाने सिडकोकडून रीतसर खरेदी केला आहे. मात्र, या भूखंडावर डोळा असलेल्या निमोने कुटुंबाने येथे अतिक्रमण सुरू केले. रमेश पाडसवान, त्यांचा मुलगा प्रमोद आणि नातू रुद्र यांनी याला विरोध केला. मात्र, काशीनाथ निमोने, ज्ञानेश्वर निमोने, सौरभ निमोने, गौरव निमोने यांनी पाडसवान कुटुंबाला त्रास देणे सुरू केले.

दरम्यान, पाडसवान यांनी मोकळ्या भूखंडावर बांधकाम सुरू करण्यासाठी साहित्य आणले असताना निमोने कुटुंब येथे शेड उभारत होते. याप्रकरणी आज दुपारी काही राजकीय पदाधिकारी यांनी बैठक घेत गणपती महोत्सव असल्याने वाद नको अशी भूमिका घेतली. मात्र, बैठकीच्यानंतर काही वेळातच निमोने कुटुंबातील काशीनाथ, ज्ञानेश्वर, सौरभ आणि गौरव यांनी पाडसवान यांच्यावर चाकू, रॉडने हल्ला चढवला. यात पाडसवान कुटुंबातील रमेश, प्रमोद आणि रुद्र हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान प्रमोद ( ३८) यांचा मृत्यू झाला. तर रमेश पाडसवान  तर रुद्र हे गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर