शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

हरभर्‍याच्या किमान दराला घसरण

By admin | Updated: May 19, 2014 01:06 IST

लातूर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभर्‍याच्या किमान दरात घसरण झाली आहे़ परिणामी त्याचा शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे़

लातूर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभर्‍याच्या किमान दरात घसरण झाली आहे़ परिणामी त्याचा शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे़ हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने हा परिणाम जाणवत आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांतून नाराजी व्यक्त होत आहे़ शेतीमालास योग्य भाव मिळावा तसेच शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने हमीभाव जाहीर करुन तूर व हरभरा खरेदी करण्याच्या सूचना केल्या होत्या़ त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडने फेब्रुवारीपासून लातूरसह अहमदपूर, उदगीर आणि औसा या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु केले होते़ हे खरेदी केंद्र १० मेपर्यंत सुरु राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ त्याप्रमाणे चार ठिकाणी हरभर्‍याची खरेदी करण्यात आली़ मुदत संपल्याने हमीभाव खरेदी केंद्राला टाळे लावण्यात आले़ हे खरेदी केंद्र सुरु राहिलेल्या कालावधीत शेतकर्‍यांच्या हरभर्‍यास लातुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण भाव २८०० ते २९०० रुपये असा मिळत राहिला़ तसेच किमान भावही २४०० रुपयांपेक्षा जास्त होता़ हमीभाव केंद्र बंद झाल्यानंतरच्या कालावधीपासून बाजार समितीत हरभर्‍याच्या किमान दरात घसरण झाली असल्याचे पहावयास मिळत आहे़ १० मे रोजी किमान भाव २ हजार ३००, १२ मे रोजी २ हजार ३००, १५ मे रोजी २ हजार ७५ तर १७ मे रोजी २ हजार २६१ रुपये किमान दर मिळाला आहे़ त्याचबरोबर कमाल दरातही घसरण झालेली दिसून येत आहे़ वास्तविक पहाता, यंदा जिल्ह्यात हरभर्‍याचे उत्पन्न वाढले आहे़ फेब्रुवारी- मार्च महिन्यात गारपीट झाल्याने बहुतांशी शेतकर्‍यांचे नुकसान झाले़ या नुकसानीतून बचावलेले उत्पन्न पदरात पाडून घेण्यासाठी राशीही खोळंबल्या होत्या़ उशिरा राशी झाल्याने शेतकर्‍यांना हमीकेंद्राचा लाभही घेता आला नाही़ केंद्र बंद झाल्याने शेतकर्‍यांना बाजार समितीत हरभरा आणावा लागत आहे़ परंतु, किमान दरात मात्र मोठी घसरण होत आहे़ (प्रतिनिधी) आवक चांगली़़़ हरभर्‍यास चांगल्यापैकी भाव मिळत आहे़ गारपिटीमुळे निकृष्ट दर्जाचा माल आल्याने त्याला दरही कमी मिळाला असेल़ सर्वसाधारण भाव चांगला असून आवकही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आडत व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले़