सहा उमेदवारांचा खर्च नील

By Admin | Updated: October 7, 2014 00:43 IST2014-10-07T00:37:42+5:302014-10-07T00:43:14+5:30

औरंगाबाद : केंद्रीय खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

The expenditure of six candidates is Neil | सहा उमेदवारांचा खर्च नील

सहा उमेदवारांचा खर्च नील

औरंगाबाद : केंद्रीय खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील खर्च सादर केला असला तरी काही जणांनी मात्र, आतापर्यंत काहीच खर्च केला नसल्याचे दाखविले आहे.
निवडणूक आयोगाने नऊ विधानसभा मतदारसंघांसाठी मोहम्मद अबू समा आणि अरविंद शर्मा या दोन खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी अरविंद शर्मा यांनी शनिवारी शहरातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी केली. त्याकरिता उमेदवारांकडून आतापर्यंत केलेल्या खर्चाची माहिती मागविण्यात आली होती
निवडणूक विभागाच्या यंत्रणेकडून उमेदवारांच्या खर्चाची स्वतंत्रपणे नोंद ठेवली जात आहे. या दोन्ही नोंदीची एकमेकांशी तुलना करून त्याची तपासणी केली जात आहे. शनिवारी या नोंदी तपासल्या असता सहा उमेदवारांनी त्यांचा खर्च ‘नील’ दाखविला होता. त्यामुळे खर्च निरीक्षकही अवाक झाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून आतापर्यंत अनामत रक्कम भरणे, निवडणूक कार्यालयात येणे, प्रचार आदींवर खर्च झालेला असताना खर्च ‘नील’ कसा, असा सवाल त्यांनी केला. तसेच संबंधित उमेदवारांना नव्याने खर्च सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांच्यासह संबंधित अधिकारी, काही उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: The expenditure of six candidates is Neil