शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव तलावाचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: September 11, 2014 01:11 IST

शेख महेमूद तमीज, वाळूज औरंगाबाद मुरूममाफियांमुळे वडगावच्या पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात आले

शेख महेमूद तमीज, वाळूज औरंगाबादमुरूममाफियांमुळे वडगावच्या पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, मोठ्या प्रमाणात उत्खननामुळे तलावातील खड्डे यमदूत बनले आहेत. गत चार वर्षांत तलावातील खड्ड्यात बुडून तीन विद्यार्थ्यांसह गणेशोत्सवात एका गणेशभक्ताचा मृत्यू झाल्यामुळे या तलावाची ओळख ‘मौतका तालाब’ म्हणून होत आहे.येथील पाझर तलावाचा कब्जा मुरूममाफियांनी घेतला असून, तलावात दररोज मोठ्या प्रमाणात जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करून मुरूम-मातीची चोरटी वाहतूक करण्यात येते. तलावाच्या पात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात दरवर्षी तलावातील या धोकादायक खड्ड्यात पाणी साचत असते. खड्ड्यांची माहिती अनेकांना नसल्यामुळे पोहण्याच्या मोहामुळे गंभीर स्वरूपाच्या घटना घडतआहेत. या तलावातील अवैध मुरूम-मातीकडे महसूल विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाणी पिण्यासाठी जाणारी अनेक जनावरेही या खड्ड्यांत पडून मृत्युमुखी पडली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जनप्रसंगी संतोष मोरे या कामगाराचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. कारवाई होत नसल्यामुळे या तलावातून दिवस-रात्र मुरूम-मातीची चोरटी वाहतूक सुरू आहे. मुरूममाफियांची दहशत तसेच महसूल विभाग व मुरूममाफियांचे ‘आर्थिक हितसंबंध’ असल्यामुळे या तलावातील मुरूम चोरीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.करोडी-साजापूर परिसरात मुरुम-माती चोरीकरोडी-साजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुम-मातीची चोरटी वाहतूक सुरूअसून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.या परिसरातील शासकीय गायरान जमिनीतून दररोज जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करून अवैधरीत्या मुरुम-मातीची चोरी केली जात आहे. सध्या पावसाळा सुरूअसून औद्योगिक परिसरात रस्त्यावरील ठिकठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी मुरमाची मागणी वाढली आहे. त्यामुळे या शासकीय गायरानातून ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहनांतून मुरुममाफिया मुरमाची चोरी करीत आहे. रात्रीच्या वेळी जेसीबी यंत्राच्या मदतीने जमीन नांगरून मुरुम उकरून ठेवला जातो. यानंतर वाहनाच्या मदतीने मुरमाची चोरटी वाहतूक करण्यात येते. वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात मुरमाला चांगली मागणी असून, या बिनभांडवली व्यवसायात अनेकजण उतरले आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळे या मुरूममाफियांविरुद्ध कारवाई करण्यास महसूल विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे चोरटी वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.चार वर्षांपूर्वी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यूचार वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर २०१० मध्ये बजाजनगरातील अल्फोन्सा शाळेचे विद्यार्थी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची सुटी असल्यामुळे ऐतिहासिक भांगसी माता गडावर दर्शनासाठी गेले होते. गडावरून दर्शन करून परत येत असताना त्यांना वडगावच्या पाझर तलावात पाणी दिसल्यामुळे पोहण्याचा मोह झाला होता. तलावात पोहत असताना पंकज दत्तात्रय उबाळे (१४), अमन अजय मलिक (१६) व सिद्धांत राकेश रॉय (१७) यांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. नशीब बलवत्तर असल्यामुळे केशव जोशी, रवींद्र राजपूत, अक्षय झांडुरे, मनीष यादव या चार विद्यार्थ्यांचे प्राण वाचले होते. यंदा ८ सप्टेंबरला तलावात श्री गणरायाचे विसर्जन करताना संतोष विठ्ठल सोनवणे या कामगार गणेशभक्ताचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे गणेशभक्त व नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.