शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तीन ग्रामपंचायतींचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: November 7, 2014 00:41 IST

कळंब : ‘घर तिथे शौचालय, हागणदारीमुक्त गाव’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्यामुळे तालुक्यातील

कळंब : ‘घर तिथे शौचालय, हागणदारीमुक्त गाव’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्यामुळे तालुक्यातील ३७ सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. यामध्ये अकरा ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा समावेश असून, तीन ग्रामपंचायतीचे तर जवळपास संपूर्ण बोर्डच अपात्र ठरल्याने या ग्रामपंचायतीच्या बोर्डांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१), (ज ५) नुसार मुदतीत शौचालय बांधून त्याचा वापर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना पदावर अनर्ह (अपात्र) ठरविण्याची तरतूद आहे. याच अधिनियमातील कलम १६ नुसार कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. कळंब तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींमध्ये ७६७ ग्रामपंचायत सदस्य आहेत. सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर १० जानेवारी २०११ ते १० जानेवारी २०१२ या दरम्यान सर्व सदस्यांनी आपल्या शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव व ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक होते. या कालावधीत असे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना आपले म्हणणे सादर करण्याची संधीही देण्यात आली होती. याउपरही प्रमाणपत्र व ठराव सादर केले नसल्याने ३७ सदस्यांवर अनर्हतेची कारवाई अपर जिल्हाधिकारी जोतीबा पाटील यांनी केली आहे. यात एकूण ११ ग्रामपंचायतीतील सदस्यांचा समावेश असून, यातही कोठाळवाडी व शिंगोलीतील सर्व तर आडसूळवाडी येथील सातपैकी सहा आणि वाकडी येथील सात पैकी चार सदस्यांवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे असतित्व धोक्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत काही सदस्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले आहे. (वार्ताहर)