खळबळजनक ! कारमधील स्फोटानंतर मृतावस्थेत आढळले नग्न कपल; गांधेली शिवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 07:47 PM2022-02-16T19:47:28+5:302022-02-16T19:47:57+5:30

कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Exciting! Naked couple found dead after car explosion; Incidents in Gandheli Shivara | खळबळजनक ! कारमधील स्फोटानंतर मृतावस्थेत आढळले नग्न कपल; गांधेली शिवारातील घटना

खळबळजनक ! कारमधील स्फोटानंतर मृतावस्थेत आढळले नग्न कपल; गांधेली शिवारातील घटना

googlenewsNext

औरंगाबाद : बंद कारमध्ये अचानक स्फोट झाल्याने त्यातील नग्न प्रेमी युगुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी शहर लगतच्या गांधेली शिवारात उघडकीस आली. कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसून कारमधील एसीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

शहरालगतच्या गांधेली शिवारात सहारा सिटीचे काम सुरु आहे. याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एक कार बेवारस आढळून आली होती. कारची तपासणी केली असता त्यात आक्षेपार्ह स्थितीत प्रेमी युगुल मृतावस्थेत आढळून आले. दोघांची वय चाळीस वर्षांपर्यंत असून अद्याप त्यांची ओळख पटली नाही. कारच्या सर्व काचा बंद असल्याने त्यातील एसीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

माहिती मिळताच चिखलठाणा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यानंतर दोन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आली आहेत. कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Exciting! Naked couple found dead after car explosion; Incidents in Gandheli Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.