लोकविकास बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:04 IST2021-09-22T04:04:22+5:302021-09-22T04:04:22+5:30

बँकेचे अध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बँकेचे सभासद रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ...

Excitement of Annual General Meeting of Lok Vikas Bank | लोकविकास बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

लोकविकास बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

बँकेचे अध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बँकेचे सभासद रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सभेचे ऑनलाईन उद्घाटन झाले. बँक लवकरच ३ अत्याधुनिक एमटीएम सुरु करणार आहे. याचबरोबर क्यूआर कोड, आयएमपीएस व यूपीआय या सेवा येत्या काळात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जाधव यांनी दिली. सभासदांना या वर्षी १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय औटी, यांनी सर्वसाधारण सभेची विषयसूची मांडली व सभासदांनी त्यास मंजुरी दिली. या वेळी सर्व संचालक व सभासदांची ऑनलाईन उपस्थिती होती.

(वा प्र)

कॅप्शन : लोकविकास नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन

करताना बँकेचे अध्यक्ष एकनाथ जाधव. शेजारी संचालक केशव तुपे, मुरलीधर जगताप, उपाध्यक्ष रामदास फड, संचालक ललित माळी, दीपक अहिरे, पोपट जाधव, जे. के. जाधव.

Web Title: Excitement of Annual General Meeting of Lok Vikas Bank