शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात शनिवारी होणार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन

By admin | Updated: August 21, 2014 00:12 IST

औरंगाबाद : लोकमतने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मालिकेचा भाग म्हणून औरंगाबाद शहरात २३ आॅगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन होत आहे.

औरंगाबाद : लोकमतने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मालिकेचा भाग म्हणून औरंगाबाद शहरात २३ आॅगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन होत आहे. सिडकोच्या एन-५ मधील जगद्गुरू संत तुकोबाराय नाट्यगृहात दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत तीन सत्रांमध्ये हे संमेलन होईल. पहिल्या सत्रात स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे लेखक तथा प्रख्यात मार्गदर्शक प्रा. तुकाराम जाधव हे ‘एमपीएससी अभ्यास व काळजी’ हा विषय मांडतील. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांचे एमपीएससी निवड प्रक्रियेवर मार्गदर्शन होईल. तसेच ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली स्पर्धा परीक्षा अ‍ॅटिट्युड व अ‍ॅप्टिट्युड या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विशेष म्हणजे शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवडक लिखित प्रश्नांना तज्ज्ञ मार्गदर्शक उत्तरेही देतील. संमेलन निर्धारित वेळेवर सुरू होणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम आसन आहे. तसेच प्रवेश सर्वांसाठी खुला असून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी शनिवारी दुपारी ३.३० वाजता सिडकोतील नाट्यगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे लेखक तुकाराम जाधव तसेच ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली करणार मार्गदर्शन.