शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अवयव दानाचा संकल्प प्रत्येकाने करावा-पाटील

By admin | Updated: September 1, 2016 01:00 IST

जालना : समाजात आज अनेक रूग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. या रूग्णांना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने

जालना : समाजात आज अनेक रूग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. या रूग्णांना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी केले.जालना शहरातील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात नगर परिषद व जिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबीर व महाअवयवदान अभियान जनजागृती शिबीराच्या उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पाटील बोलत होत्या.यावेळी मनकर्णा डांगे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुनिता गोलाईत, डॉ. वि.भा. भिवरे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावकस्कर, तृप्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील पुढे म्हणाल्या की, अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करून अवयवदानासंदर्भात समाजामध्ये आजही अनेक गैरसमज असून ते दूर होणे गरजेचे आहे. आपल्या अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नव्याने जीवन प्राप्त होणार असल्याने प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.यावेळी अवयवदानाचे महत्व पटवून देणारा ‘फिर जिंदगी’ हा लघुपटही उपस्थितांना दाखिवण्यात आला. तसेच तज्ज्ञांनी महिलांची व बालकांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यंकट कुलकर्णी यांनी मानले.बचतगटातील महिला सदस्या, रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)