शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

उष्णतेच्या लाटेने बाष्पीभवन वाढले; मराठवाड्यातील प्रकल्पांत भर उन्हाळ्यात ५१ टक्के पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:31 AM

मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ५५ प्रकल्प सध्या जोत्याखाली आले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील लहान, मोठे व मध्यम जलप्रकल्प भर उन्हाळ्यात एप्रिल संपण्यापूर्वीच ५१ टक्क्यांवर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी प्रकल्पातील पाणी कमी झाले आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून पाण्याचे बाष्पीभवन वाढू लागले आहे. ११ मोठ्या प्रकल्पांतील ७.२७५ दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याची वाफ (बाष्पीभवन) झाली आहे. मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ५५ प्रकल्प सध्या जोत्याखाली आले आहेत. २११ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

गेल्या पावसाळ्यात विभागातील सगळी धरणे ओव्हरफ्लो झाली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा साठा २०२०-२१ च्या तुलनेत बऱ्यापैकी असला तरी तापमान वाढल्याचा फटका जलप्रकल्पांना बसू लागला आहे. मागच्या वर्षी एप्रिल अखेरीस ५५ टक्क्यांच्या आसपास जलसाठा विभागात होता. मे महिन्यात आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

तापमान वाढीचा फटका जलाशयांनामराठवाड्यातील जलप्रकल्पांना तापमान वाढीचा फटका बसला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांतील बाष्पीभवन वाढत आहे, तर लघु व मध्यम प्रकल्पांतील पाणी वेगाने आटत आहे. ५० ते ७५ टक्के पाणी ८ मध्यम प्रकल्पांत आहे. ७५ टक्के पाणी फक्त एका प्रकल्पात आहे.

जायकवाडीत ५६ टक्के पाणीजायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ५५ टक्के जलसाठा होता. धरणातून १.७ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. मध्यम प्रकल्पांत ४५ टक्के, लघु प्रकल्पांत ३१ टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ४७ टक्के, इतर बंधाऱ्यांत ८९ टक्के जलसाठा सध्या आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लघु आणि मध्यम प्रकल्पांत बऱ्यापैकी साठा आहे.

विभाग प्रकल्पांतील साठा असामोठे प्रकल्प -११- ५९.५२ टक्के जलसाठामध्यम प्रकल्प - ६५- ४५.२ टक्के जलसाठालघु प्रकल्प- ७४९- ३१.६१ टक्के जलसाठागोदावरी बंधारे- १५- ४७.९८ टक्के जलसाठाइतर बंधारे- २५ - ८९.१४ टक्के जलसाठाएकूण - ८७५- ५१.९५ टक्के जलसाठा

 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा