शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण पथकाशी वाद

By admin | Updated: June 10, 2016 23:45 IST

परभणी : शहरातील गंगापुत्र कॉलनी ते आझम कॉलनी रस्त्याच्या उजव्या बाजूला नाल्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी मनपा पथकाच्या वतीने काढण्यात आली.

परभणी : शहरातील गंगापुत्र कॉलनी ते आझम कॉलनी रस्त्याच्या उजव्या बाजूला नाल्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी मनपा पथकाच्या वतीने काढण्यात आली. या मोहिमेदरम्यान सायंकाळी ५ वाजता काही जणांनी पथकाशी किरकोळ कारणावरुन वाद घातला. यानंतर मनपाने घटनास्थळी पोलिस बंदोबस्त मागविला होता. मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात मोहीम राबविली जात आहे. १० जून रोजी सकाळी दर्गा रस्त्यावरील गंगापुत्र कॉलनी येथून नाल्यावरील अतिक्रमण, ओटे काढण्यास सुरुवात झाली. रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली सर्व अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. स्वच्छता निरीक्षक सुनील वसमतकर यांच्या पथकाने सर्व अतिक्रमणे काढली. जेसीबी व टिप्परच्या सहाय्याने १५ कर्मचाऱ्यांचा मोहिमेत सहभाग होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास एका चौकात पथकासोबत काही जणांनी वाद घातला. यानंतर कोतवाली व नानलपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांसह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रौफ, बोके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे यांनी घटनास्थळी भेट देऊन जमावाला शांत करीत मोहीम सुरु ठेवली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच जुना मोंढा भागात स्वच्छता निरीक्षक के. बी. हैबते यांच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे काढली. (प्रतिनिधी)