एन्काउंटरमुळे ५ किलो सोने, ३२ किलो चांदीचे गूढ कायम, मृत अमाेलने सोने दिले कोणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:42 IST2025-05-28T12:41:35+5:302025-05-28T12:42:53+5:30

परराज्यात सोने ठेवल्याचा पोलिसांना संशय; पाच दरोडेखोरांना १४ दिवसांची पोलिस कोठडी

Encounter In Chhatrapati Sambhajinagar: Encounter leaves 5 kg gold, 32 kg silver a mystery, to whom did the deceased Amol Khotkar give the gold? | एन्काउंटरमुळे ५ किलो सोने, ३२ किलो चांदीचे गूढ कायम, मृत अमाेलने सोने दिले कोणाकडे?

एन्काउंटरमुळे ५ किलो सोने, ३२ किलो चांदीचे गूढ कायम, मृत अमाेलने सोने दिले कोणाकडे?

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्याकडील दरोड्यात ५.५ किलो सोन्याचे दागिने व ३२ किलो चांदी लुटली गेली. त्यापैकी केवळ २० तोळे सोनेच आतापर्यंत पोलिसांना मिळाले आहे. दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याच्या एन्काउंटरमुळे मात्र आता या सोन्याचे गूढ वाढले आहे. त्याने ते सोने कोणाकडे दिले, हे तपासणे पोलिसांसमाेर आव्हान बनले आहे.

अमोलच्या एन्काउंटरमुळे दोन दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्याच्या पाचही साथीदारांना मंगळवारी पहाटे ४:३० वाजता अटक दाखवण्यात आली. गुन्हे शाखेने त्यांना दुपारी २:३० वाजता न्यायालयात हजर केले. जवळपास २५ मिनिटे सुनावणीत न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पाच जणांकडून पोलिसांना केवळ २० तोळे सोने मिळवता आले.

लड्डांची माहिती देणारा कोण?
न्यायालयात बाजू मांडताना दरोडेखोरांनी बहुतांश सोने परराज्यात ठेवल्याचे किंवा विकल्याचा संशय व्यक्त केला. शिवाय, माहीतगाराशिवाय हा दरोडा अशक्य असल्याने अमाेल व योगेशला लड्डा यांची माहिती कोणी दिली, याचा अद्यापही पोलिसांनी उलगडा केला नाही. त्याचा शोध घेणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू
दरम्यान, घाटी रुग्णालयात रात्री ८ वाजता सुरू झालेल्या अमोलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घाटी रुग्णालयातदेखील एसआयडी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थित पंचनाम्यानंतर शवविच्छेदनास सुरुवात करण्यात आली.

जवळच्याच व्यक्तीकडे दिल्याचा संशय
अमोलने सोने कुठे ठेवले, हा प्रश्न मंगळवारी अनुत्तरित राहिला. जवळच्याच व्यक्तीकडे ते ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी त्याच्या मैत्रिणीची बुधवारी चौकशी केली जाणार आहे.

Web Title: Encounter In Chhatrapati Sambhajinagar: Encounter leaves 5 kg gold, 32 kg silver a mystery, to whom did the deceased Amol Khotkar give the gold?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.