शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाला भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 10, 2014 00:00 IST

परभणी : गेल्या अकरा दिवसांपासून भक्तांना खिळवून ठेवणाऱ्या गणपती बाप्पाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

परभणी : गेल्या अकरा दिवसांपासून भक्तांना खिळवून ठेवणाऱ्या गणपती बाप्पाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. सोमवारी सायंकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. यामध्ये देशमुख गल्ली मित्रमंडळ, राजे संभाजी मित्र मंडळ, सुवर्णकार गणेश मंडळ, बालाजी गणेश मंडळ, नागराज मित्रमंडळ, ओम मित्रमंडळ यांच्यासह इतर काही मंडळांनी सहभाग नोंदविला होता. सजीव देखाव्यासह ढोल-ताशांचा गजर आणि नृत्याने परिसर दणाणून गेला होता. शहरातील भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाले होते. विठ्ठल-रुख्मिणी, सीता-राम, हनुमान व वानरसेना आदी देखावे आकर्षण ठरले. नागराज मित्रमंडळाच्या वतीने सादर केलेल्या समईनृत्याला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सुवर्णकार गणेश मंडळाचा बाप्पाचा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. दिंडीमध्ये सहभागी झालेले बाल-गोपाळ, कलशधारी महिला, भारुडकार आदींंनी वातावरण भक्तिमय झाले होते. शिवाजी चौकामध्ये खा. बंडू जाधव, युवासेनेचे डॉ.राहुल पाटील, गंगाप्रसाद आणेराव, माणिक पोंढे, अनिल डहाळे यांच्यासह शिवसैनिकांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. तसेच दुसऱ्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, उपअधीक्षक प्रणय अशोक, दीपक पुजारी यांची उपस्थिती होती. या मिरवणुकीत उंट, घोडे, लेझीम पथक, वासुदेवही सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाने मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. गणेश मंडळांनी रात्री उशिरा गणपती बाप्पाचे विसर्जन केले.(प्रतिनिधी)