शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

छावण्यांमध्ये संतापाचा भडका !

By admin | Updated: February 17, 2016 00:39 IST

बीड : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना सोमवारी महसूल व वनविभागाने काढलेल्या छावण्या बंदच्या आदेशाचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले

बीड : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना सोमवारी महसूल व वनविभागाने काढलेल्या छावण्या बंदच्या आदेशाचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. ठिकठिकाणच्या छावण्यांमध्ये शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पालवण (ता. बीड) येथील शिवसंग्रामच्या छावणीत महसूलमंत्र्यांचा पुतळा जाळून छावणी बंदच्या आदेशाची होळी करण्यात आली. त्यामुळे छावणी आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.रबी हंगामातून उपलब्ध होणारा चारा तीन महिने पुरेल असा अहवाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात शासनाला कळविले होते. त्यानंतर महसूल व वनविभागाचे उपसचिव अशोक आत्राम यांनी छावण्या बंद करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आदेशाने छावणीचालकांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला. पोटच्या लेकरागत जपलेली जनावरे छावण्यांतून गोठ्यात आली तर त्यांना चारा- पाणी उपलब्ध करायचा कसा? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजप- सेनेच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के संचालक असलेल्या पालवण (ता. बीड) येथील छावणीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याशिवाय शासनआदेशाची होळी करुन संतापाला वाट मोकळी करुन दिली. यावेळी मस्के यांच्यासह मनोज जाधव, मनोज आगे व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसंग्राम, काँग्रेसने बोलावली बैठकबुधवारी चारा छावणी बंदचा निर्णय हाणून पाडण्यासाठी आंदोलनाचीदिशा ठरविण्याकरता कॉँग्रेस व शिवसंग्राम संघटनेने स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत. छावणीचालक, पशुपालक व शेतकऱ्यांना पाचारण केले आहे. किसान सभेकडून निषेधचारा छावण्या बंद करु नयेत, अशी मागणी किसान सभेने मंगळवारी केली आहे. या निर्णयाचा पुर्नविचार करण्यासाठी निषेध करण्यात आला. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर आहे. आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे छावण्या बंदचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखेमवर मीठ चोळणारा असल्याचे जिल्हा सचिव कॉ. विनोद सवासे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)