शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

वीज वाहिनी कोसळून पाच घरांना आग

By admin | Updated: June 6, 2014 01:11 IST

सोयगाव : तालुक्यातील बहुलखेडा येथे उच्च दाबाची वीज वाहिनी तुटून घरावर पडल्याने पाच घरे जळून खाक झाली. विद्युत प्रवाह असलेली लोंबकळणारी तार व घरांना लागलेली

सोयगाव : तालुक्यातील बहुलखेडा येथे उच्च दाबाची वीज वाहिनी तुटून घरावर पडल्याने पाच घरे जळून खाक झाली. विद्युत प्रवाह असलेली लोंबकळणारी तार व घरांना लागलेली आग अशा दुहेरी संकटातून या घरातील वीस जणांना वाचविण्यात गावकर्‍यांना यश आले. गुरुवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.बहुलखेडा येथे सोयगाव-बनोटी रोडलगत असलेल्या वसाहतीत राहणार्‍या सुभानखॉ लालखॉ पठाण, शरीफ सुभान पठाण, हबीबखॉ पठाण, शेख सलीम शेख ईसा, शेख सत्तार शेख ईसा हे आपल्या परिवारासह बुधवारी रात्री झोपलेले होते. रात्री अचानकपणे ११ के.व्ही. वीज पोल इन्सुलेटर खराब झाल्यामुळे उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून त्यांच्या घरावर पडली. यात मोठा स्फोट झाला व पाच घरांना आग लागली. या पाचही घरात २० जण अडकून पडले होते. घरातील टीव्ही, दोन शिलाई मशीन, पंखा यासह धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नरसिंग सोनवणे, वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तहसीलदार नरसिंग सोनवणे, मंडळ अधिकारी व्ही. टी. जाधव, व्ही.टी. राऊत, तलाठी विजय शेळके यांनी घटनेचा पंचनामा केला, तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी नगराळे यांनी मृत शेळीचा पंचनामा केला. या घटनेत पाच घरांचे १ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तहसील पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)शेळीचा मृत्यू; संसारोपयोगी साहित्य खाकघराला लागलेली आग व बाहेर विद्युत प्रवाह असलेली विद्युत तार लोंबकळत असल्याने घरातील लोकांना बाहेर निघता येत नव्हते. लहान मुले, महिलांनी एकच आक्रोशकेला. शेतातून घरी येत असलेल्या विनोद जाधव यांना आगीचे लोळ दिसले. त्यांनी इतरांना हाक दिली. विनोद जाधव, विनोद वानखेडे, सिद्धार्थ वानखेडे, महंमद शरीफ, राजमल पवार, रमेश जाधव, समशेर गफूर आदींसह ग्रामस्थांनी आगीतून व विद्युत प्रवाहातून जळीत घरातील लोकांना सुखरूप बाहेर काढले.सोयगाव उपकेंद्रात संपर्क साधून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. शेख सत्तार, हबीबखॉ पठाण, शरीफ पठाण, सुभानखॉ पठाण हे चौैघे भाजले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आगीत एका शेळीचा मृत्यू झाला.