शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी एमआयएमकडून इम्तियाज जलील ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 14:44 IST

रात्री आठ वाजता पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

औरंगाबाद : एमआयएमच्या हैदराबाद येथील पक्ष कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता औरंगाबाद लोकसभा संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलील योग्य असल्याचे नमूद केले. 

आज सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील एमआयएमच्या दार-उस्स- सलाम या पक्ष कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयएमचे सर्व २३ नगरसेवक, पक्षनेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खा. असदोद्दीन ओवेसी प्रचारात व्यस्त आहेत. हैदराबाद येथे त्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम सुरू केले आहे. त्यातच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी, असा स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. 

रात्री होणार अंतिम निर्णय जिल्ह्यातील मुस्लिम, दलित मतांची संख्याही काढण्यात आली आहे. लोकसभेला ५२ ते ५५ टक्के मतदान होते. मतदानाची ही टक्केवारी गृहीत धरून उमेदवार निवडून येऊ शकतो का? याचेही गणित एमआयएम कार्यकर्ते यांनी पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या समोर आज झालेल्या सभेत मांडले. खासदार ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलील योग्य असल्याचे नमूद केले. रात्री आठ वाजता पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

एमआयएमच्या निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्षऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास तिरंगी लढत पाहायला मिळेल. एमआयएम पक्षप्रमुखांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास या मतदारसंघात पारंपरिक सेना विरुद्ध काँग्रेस, अशी लढत पाहायला मिळेल. मुस्लिम, दलित मतांचे विभाजन झाल्यास याचा थेट फायदा युतीच्या उमेदवाराला होईल, असेही जाणकारांचे मत आहे. प्रत्येक निवडणुकीत सेनेला मत विभाजनाचा चांगलाच फायदा झालेला आहे. यंदाही त्रिकोणी लढत होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबाद