शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

‘वैद्यनाथ’च्या निवडणुकीने तालुका निघाला ढवळून

By admin | Updated: April 20, 2015 00:33 IST

परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक तब्बल १६ वर्षानंतर यावेळी गाजत आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विरूध्द पालकमंत्री पंकजा मुंडे

परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक तब्बल १६ वर्षानंतर यावेळी गाजत आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विरूध्द पालकमंत्री पंकजा मुंडे अशी नात्यागोत्यातील थेट लढत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने बहीण-भाऊ आमनेसामने आहेत. प्रचाराच्या धुराळ्याने तालुका ढवळून निघाला आहे.२६ एप्रिल रोजी होत असलेल्या या निवडणुकीत सुरूवातीपासूनच गरमागरमी आहे. आता दोन्ही गटाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे या तीन बहिणी किल्ला लढवित आहेत तर राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते पंडितराव मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे.दरम्यान, खा. प्रीतम मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली होती. त्यात प्रीतम यांच्या मदतीला धाकटी बहीण अ‍ॅड. यशश्री यांनी उडी घेतली आहे. दुसरीकडे पुत्र धनंजय यांच्यासाठी पंडितराव मुंडे हे सरसावले असून, त्यांनीही प्रचारात सहभाग घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक मुंडे विरूद्ध मुंडे अशी होत असून, नेतृत्वाची परीक्षा आहे.पंकजा मुंडे स्वत: उमेदवार आहेत मात्र, त्यांनी आतापर्यंत जाहीर वक्तव्य केलेले नाही. (वार्ताहर)