"शत प्रतिशत भाजपमुळेच शिंदेंना संपवलं जातंय!"; अमित शाहांना सर्व माहिती, दानवेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:08 IST2025-11-20T18:04:48+5:302025-11-20T18:08:42+5:30
''एकनाथ शिंदेंचा महायुतीत सन्मान राखला जात नाही!" अंबादास दानवे यांचा गौप्यस्फोट

"शत प्रतिशत भाजपमुळेच शिंदेंना संपवलं जातंय!"; अमित शाहांना सर्व माहिती, दानवेंचा दावा
छत्रपती संभाजीनगर: शत प्रतिशत भाजप हा अजेंडा घेऊन भाजप काम करीत असते. सर्वप्रथम भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवत असतो, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमी सांगत असतात. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना हे सगळे माहिती असते. यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महायुतीमध्ये सन्मान राखला जात नाही, असे दिसून येत असल्याचे उद्धवसेनेचे नेते तथा माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरूवारी(दि. २०) येथे पत्रकारांना सांगितले केला.
दानवे यांनी त्यांच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची संवाद साधला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी फोडाफोडी केली आहे. अनेकांना आमिषे दाखवून त्यांनी संघटना तयार केली आहे. शिवसेना प्रमुख यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. अजून बरीच कामे बाकी आहेत. उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने आता या कामांना गती येईल आणि काम चांगले होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणालात. त्या भाजपला त्यांच्या पक्षाचा पाठिंबा चालतो, हा भाजपचा ढोंगीपणा असल्याची टीकाही दानवे यांनी केली. कोकणात वाढलेली राणे यांची मस्ती तोडण्यासाठी एकत्र आले असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. भारतीय जनता पक्षाला पूर्ण उमेदवार मिळाले नाही.
भुमरे यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढणार
खासदार संदीपान भुमरे यांचे भ्रष्टाचार प्रकरण लवकरच बाहेर काढणार आहे, असा इशारा दानवे यांनी दिला. त्यांच्या भ्रष्टाचाराची पुरावे निवडणूक झाल्यानंतर देणार. असल्याचा दावाही त्यांनी केला. कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. धाराशीव जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरणातील आरोपीला भाजपाने उमेदवारी दिली आहे. आमच्या पक्षात अशा प्रकारे गुन्हेगारांना उमेदवारी दिली जात नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.