शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसाआड पाणी

By admin | Updated: August 19, 2014 02:13 IST

परभणी: मनपाच्या नियोजनाअभावी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील दोन महिने १० ते १२ दिवसांतून एकवेळ शहरवासियांना

परभणी: मनपाच्या नियोजनाअभावी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील दोन महिने १० ते १२ दिवसांतून एकवेळ शहरवासियांना पाणी मिळत होते. त्यात अल्पशी सुधारणा करीत हा पाणीपुरवठा आठ दिवसांआड करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये आठ दिवसांना पाणी मिळत असल्याने उन्हाळ्यातील स्थिती काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा. महानगरपालिकेच्या वतीने राहटी येथील बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. परभणीची पाणीपुरवठा योजना तीस वर्षापूर्वीची आहे. दीड लाख लोकांना पाणी पुरविण्याची क्षमता या योजनेची आहे. परंतु, सध्या शहराची लोकसंख्या तीन लाखांच्यावर गेली आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना अपुरी पडते. नागरिकांना किमान एक दिवसाआड पाणी मिळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे शहरासाठी मुबलक पाणीसाठाही उपलब्ध आहे. परंतु, मनपाचे नियोजन होत नसल्याने पाणीपुरवठा वेळेवर व नियमित होेत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यात शहराला ११ व्या दिवशी पाणी मिळत होते. महिन्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा होत होता. पाण्याची ओरड वाढल्यानंतर महानगरपालिकेने नियोजन केले असून आता हा पाणीपुरवठा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. आठ दिवसांतून एक वेळ म्हणजे महिन्यातून चार किंवा पाच वेळा शहराला पाणीपुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)