शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंयकारी भूकंपाला २१ वर्ष

By admin | Updated: September 30, 2014 01:26 IST

उस्मानाबाद : विघ्नहर्त्या श्री गणेशाला मोठ्या थाटामाटात निरोप देवून निदे्रच्या आधीन झालेल्या अनेकांसाठी पुढे आलेली सकाळ आपल्या कवेत विनाश घेवूनच आली होती.

उस्मानाबाद : विघ्नहर्त्या श्री गणेशाला मोठ्या थाटामाटात निरोप देवून निदे्रच्या आधीन झालेल्या अनेकांसाठी पुढे आलेली सकाळ आपल्या कवेत विनाश घेवूनच आली होती. ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे ३.५५ वाजता सास्तूर, किल्लारीसह उस्मानाबाद, लातूर जिल्हा भूकंपाने हादरला. त्यापूर्वीही काही दिवस अगोदरपासून भूकंपाचे धक्के सुरुच होते. मात्र पहाटेच्या ६.५ रिस्टर स्केलच्या या धक्क्याने गावेच्यागावे बेचिराख केली. काय होतयं हे समजण्याअगोदरच सुमारे १० हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. १६००० पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झाले. भूकंपाने या दोन जिल्ह्यातील ५२ गावे आणि त्यातील ५३ हजार घरे उद्ध्वस्त केली. मंगळवारी या घटनेला २१ वर्ष पूर्ण होत आहेत. २१ वर्षानंतर या परिसराचे चित्र झपाट्याने बदलल्याचे दिसत आहे. मागील काही वर्ष भूकंपात कोसळलेल्या घरांचे, गावांचे अवशेष जागोजागी दिसत होते. दुसरीकडे पुनर्वसीत घरे उभारण्याची लगबग पहायला मिळत असे. या वस्त्यात नव्याने बांधलेली घरे पाहिली असता, जाती अहंकाराच्या उतरंडी शाबूत असल्याचे जाणवले. २१ वर्षानंतर बहुतांश ठिकाणचे दगड मातीचे जुने अवशेष कायमचे नष्ट झाल्याचे व त्याच्याच शेजारी शासन विविध संस्था, संघटनांनी बांधून दिलेल्या सिमेंटच्या नियोजनबध्द वस्त्या उभारलेल्या आहेत. मात्र रोजच्या जगण्याच्या... रोजी-रोटीच्या प्रश्नांचा पिंगाही सुरुच आहे. भूकंपग्रस्त म्हणून असलेली ओळख काळाच्या ओघात अशी पुसली जात असतानाच नवी पिढीही या विनाशकारी घटनेबद्दल अनभिज्ञ दिसली. मात्र या भूकंपाच्या झळा ज्यांनी अंगाखांद्यावर झेलल्या...सोसल्या...भोगल्या, आपल्या आप्तेष्टांना डोळ्यासमोरुन हिरावून जाताना पाहिले त्यांच्या जखमा मात्र २१ वर्षानंतरही ओल्याच असल्याचे दिसून आले. त्यामुळेच भुकंपाची ती भयान काळरात्र आठवते. अन् मग आपोआपच त्यांच्या डोळ्यांच्या कडा अश्रुंनी चिंब होवून जातात. भूकंपग्रस्त गावात असे अनेक उंबरठे आहेत. जिथे नावालाही माणूस राहिलेला नाही. तर काही ठिकाणी घरात एखादाच माणूस राहिल्याचे दिसते. संपूर्ण कुटुंबावर एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर परमेश्वराने मला तरी का ठेवले? या त्यांच्या काळीज चिरणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडेच नसते. भूकंपात गेलेल्यांच्या स्मृतींना मंगळवारी पुन्हा उजाळा मिळणार आहे. (प्रतिनिधी)