सीओंच्या प्रतिमेला घातले गटारस्नान !

By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T23:25:20+5:302014-07-25T00:28:03+5:30

बीड: हद्दवाढीत पालिकेत समावेश होऊन तीन वर्षे उलटली; पण मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गुरुवारी सीओंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला गटारस्रान घालून आंदोलन करण्यात आले.

Dyatarasanan inserted in the image of the CEO! | सीओंच्या प्रतिमेला घातले गटारस्नान !

सीओंच्या प्रतिमेला घातले गटारस्नान !

बीड: हद्दवाढीत पालिकेत समावेश होऊन तीन वर्षे उलटली; पण मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गुरुवारी सीओंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला गटारस्रान घालून आंदोलन करण्यात आले.
एकनाथनगर, ज्ञानेश्वरनगर, आदित्यनगर भागात दहा हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. येथे अद्याप नळजोडण्या नाहीत. धड रस्तेही नाहीत. राजीव गांधी चौकातून गेलेला मुख्य रस्ताही जागोजागी उखडलेला आहे. परिणामी पावसाचे पाणी साचून चिखल होतो. या चिखलातून वाट काढताना पादचारी, वाहनचानलकांची त्रेधातिरपीट उडते. यासंदर्भात पालिकेला वारंवार निवेदने देऊनही उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे गुरुवारी संतप्त नागरिकांनी सीओ व्ही. बी. निलावाड यांच्या प्रतिमेला गटारस्रान घालून निषेध नोंदविला.
यावेळी मच्छिंद्र कुटे, अ‍ॅड. संतोष भालेकर, बंडू टोले, चंद्रसेन चौरे, सुरेश नेवाळे, शेख जावेद, संतोष सावंत, पंकज कुटे, बापू भोसले, प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dyatarasanan inserted in the image of the CEO!