शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उड्डाणाच्या वेळी विमानाचे पार्किंग ब्रेक जाम, सुदैवाने धोका टळला

By संतोष हिरेमठ | Updated: December 12, 2023 14:06 IST

या घटनेनंतर मुंबईहून शहरात येणाऱ्या आणि शहरातून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांचा खोळंबा झाला.

छत्रपती संभाजीनगर : ऐन उड्डाणाच्या वेळी इंडिगोच्या सायंकाळच्या मुंबई- छत्रपती संभाजीनगर विमानात बिघाड झाल्याची घटना सोमवारी मुंबई विमानतळावर घडली. या घटनेनंतर मुंबईहून शहरात येणाऱ्या आणि शहरातून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांचा खोळंबा झाला.

इंडिगोचे सायंकाळचे मुंबई-छत्रपती संभाजीनगर हे विमान दररोज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येते आणि सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मुंबईसाठी उड्डाण घेते. मुंबईहून हे विमान सोमवारी उड्डाणासाठी धावपट्टीकडे आले. तेव्हाच विमानात तांत्रिक बिघाड झाला. बऱ्याच वेळ प्रवासी विमानातच होते. अखेर सर्व प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले आणि पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रवासी मुंबई विमानतळावरच होते, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणारे प्रवासी चिकलठाणा विमानतळावर ताटकळले होते. अनेक प्रवाशांनी प्रवासाचे नियोजनच रद्द केले. मुंबईहून येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

पार्किंग ब्रेक जाम, सुदैवच
मुंबई-छत्रपती संभाजीनगर विमानाचे प्रवासी रवींद्र वैद्य म्हणाले, विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर आले. त्याच वेळी पार्किंग ब्रेक जाम झाले. तशी माहिती प्रवाशांना देण्यात आली. उड्डाणानंतर हा प्रकार झाला असता तर धोका नाकारता येत नव्हता. विमानाचे टायरही घासलेले होते. विमानाच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होत आहे, अशा प्रश्न पडत आहे. या घटनेनंतर आम्हाला विमानातून उतरविण्यात आले. अन्य विमानाची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादairplaneविमान