शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञांअभावी संगणक धूळ खात

By admin | Updated: June 17, 2014 01:11 IST

विलास भोसले , पाटोदा प्रशासकीय कामांना गती यावी, सामान्यांची कामे वेळेवर व्हावीत यासाठी लाखो रुपये खर्च करून संगणकासह इतर साहित्य खरेदी करण्यात येत आहे.

विलास भोसले , पाटोदाप्रशासकीय कामांना गती यावी, सामान्यांची कामे वेळेवर व्हावीत यासाठी लाखो रुपये खर्च करून संगणकासह इतर साहित्य खरेदी करण्यात येत आहे. असे असले तरी संगणकासह इतर उपकरणे चालविण्यास तज्ज्ञ नसल्याने ते साहित्य धूळ खात पडले आहे. या साहित्याची ‘चणे आहेत पण दात नाहीत’ अशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.प्रशासकीय कामांना गती यावी, विकासासह इतर कामे जलदगतीने व्हावीत, दफ्तर दिरंगाई होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत पासून राज्य स्तरावरील सर्वच कार्यालयांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी ‘ई-प्रशासन’ ही व्यवस्था राबविण्यात येत आहे. सामान्यांना लालफितीची फटका बसू नये, यासाठी संगणकासह इतर खरेदीवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. असे असले तरी याचा उपयोग सामान्यांसाठी होत असल्याचे दिसून येत नाहीत. तालुक्यातील पंचायत समिती व तहसील कार्यालयास अनेक संगणक देण्यात आलेले आहेत. पंचायत समितीतील ‘संग्राम’ कक्षामधून रोहयोचे काम चालते. येते कंत्राटी तज्ज्ञ असल्यान काही प्रमाणात काम केले जाते. मात्र, तहसीलमध्ये या संगणकाचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. येथे तज्ज्ञच नसल्याने संगणक धूळ खात आहेत. येथील तहसीलमधून ‘ई-डिस्ट्रीक्ट’ नावाने प्रकल्प सुरू आहे. यासाठी संगणकासह इतर सर्व साहित्य पुरविण्यात आलेले आहे. वेगवेगळे प्रमाणपत्र ‘आॅनलाईन’ देण्याचा या मागील उद्देश आहे. असे असले तरी येथे तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने शासनाच्या उद्देशालाच खो बसत आहे. पर्यायाने सामान्यांची कामेही वेळेवर होत असल्याचे दिसून येत नाही. शिधापत्रीका वितरणासाठी येथे एक प्रकल्प राबविला जातो. याप्रकल्पाची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. खाजगी तंत्रज्ञ लावून कामे केली जात आहेत. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या लिंक सपोर्ट करीत नसल्याने कामाला अनेकदा खीळ बसते. या संदर्भात नायब तहसीलदार गणेश जाधव म्हणाले, त्रुटींसंदभात वरिष्ठांना कळविले आहे. वेगाने काम करण्याचे नियोजन करू.खाजगी तंत्रज्ञांची घेतली जातेय मदतपंचायत समिती, तहसील कार्यालय येथे तंत्रज्ञ नसल्याने संगणक चालविण्यास खाजगी तंत्रज्ञांची घेतली जातेय मदत.संगणक चालविण्यास तंत्रज्ञ नसल्याने कामांना येईना गती.‘आॅनलाईन’ प्रमाणपत्र मिळण्यासही येतात अनेक अडचणी.