शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पेरण्या लांबल्या

By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST

पारध : मृग नक्षत्र संपले तरी पावसाचे आगमन झालेले नाही. परिणामी, परिसरातील पेरण्या व कापूस लागवड लांबल्याने शेतकरीवर्ग चिंंतातूर झाला आहे.

पारध : मृग नक्षत्र संपले तरी पावसाचे आगमन झालेले नाही. परिणामी, परिसरातील पेरण्या व कापूस लागवड लांबल्याने शेतकरीवर्ग चिंंतातूर झाला आहे.मागील हंगामात अतिवृष्टी, गारपीट आणि सतत वाढणाऱ्या भारनियमनाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले. या हंगामात काहीतरी पदरी पडेल म्हणून शेतकऱ्यांनी मागील महिन्यात रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेताची मशागत केली. काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा आधार घेत मोठ्या प्रमाणात कपाशी व मिरचीची लागवडही केली. मात्र इथेही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. कारण पारध परिसरात पिंपळगाव रेणुकाई, सावंगी अवघडराव, हिसोडा, लेहा, शेलूद, पारध खुर्द, पद्मावती आदी ठिकाणी मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी महागाची औषधी फवारुन ही मिरची टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी अक्षरश: हे मिरचीचे रोप उपटून फेकले. मिरची रोपांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. परत रोपे घेऊन मिरची लागवड करण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नक्कीच नाही. ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे, ती सरकी सध्या कोवळी असून कशीबशी तग धरुन आहे. मात्र वीज कंपनीने येथेही घात केला. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. त्यातच कंपनीने अचानक भारनियमन दोन तासांनी वाढविल्याने आता कपाशीचे झाडे जगवावी? कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.मान्सून वेळेवर येईल म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी पीक कर्ज खाजगी सावकाराचे कर्ज दागिने विकून अथवा गहाण ठेवून मोलामहागाचे बियाणे खरेदी करुन घरात ठेवले आहे. मात्र आठवडा उलटून गेला तरी अद्याप मान्सूनचा पाऊस पडललेला नाही. (वार्ताहर)शेतकऱ्यांना दुष्काळाची भीतीगारपीट व अतिवृष्टीने पुरत्या खचलेल्या शेतकऱ्यांची निसर्ग यंदाही चेष्टा करतो की काय, तसेच दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळाची भीती शेतकरी वर्तवित आहे.