शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजुरांनाही दुष्काळाचा फटका

By admin | Updated: April 15, 2016 00:38 IST

कडा : आष्टी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून पडलेल्या भयावह दुष्काळामुळे पाणी प्यायलाही मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच महसूल विभागाने वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे.

कडा : आष्टी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून पडलेल्या भयावह दुष्काळामुळे पाणी प्यायलाही मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच महसूल विभागाने वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे. या दोन्ही कारणांमुळे बांधकाम व्यावसायिक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुष्काळामुळे इतर कोणती कामेही मिळणे कठीण झाले आहे.महसूल विभागाने वाळू उपसा करण्यावर घातलेल्या बंदीमुळे हातात थापी, ओळंबा घेणारे गवंडी तर याच गवंड्याच्या हाताखाली माल कालवून विटा देणारा बिगारी या दोघांच्याही हाताला आता काम नसल्याने प्रपंच कसा चालवायचा? हा मोठा प्रश्न उभा ठाकला असल्याने तालुक्यातील शेकडो बांधकाम व्यावसायिक व बिगारी काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. तालुक्यात हातावर पोट भरणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हातात कोयता घेऊन ऊसतोडणीसाठी जाण्यापेक्षा गावातच गवंडी काम बिगारी काम करून याच पैशावर लेकरा-बाळांचे शिक्षण करून प्रपंच गाडा चालवला जातो. पण निसर्गाच्या अवकृपेने आणि वरूण राज्याच्या वक्रदृष्टीने पावसाने दडी मारल्याने पिण्यासाठी पाणी नाही तर बांधकामाला कुठून येणार ज्याच्याकडे थोडेफार काम करण्यापुरते पाणी आहे. असे असताना महसूल विभागाने आता वाळू उपसा करणाऱ्यांवर बंदी घातल्याने वाळू व पाण्या अभावी काम मिळेनासे झाल्याने गवंडी व बिगारी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर ऊसतोडणी मजूर गावोगाव परतल्याने त्यांच्याही समोर काम नसल्याने आता पोटापाण्यासाठी काय करायचे? असा यक्ष प्रश्न उभा रहात आहे. सरकार आता हाताला काम देत नसल्याने अनेकांनी आपल बिऱ्हाड पुणे, मुंबई, नगर, नाशिक, औरंगाबाद, अशा ठिकाणी हालवण्यास सुरुवात केल्याने आता तरी शासनाने याकडे गांभीर्याने पाहावे व महसूल विभागाने नियमाप्रमाणे वाळू उपसा करून द्यावा, शासकीय प्रोसेस नुसार वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांकडून रॉयल्टी घ्यावी व आमच्या होणाऱ्या उपासमारीची दखल घ्यावी नसता आष्टी तहसील कार्यालयावर ओळंबा, थापी, पाटी, मोर्चा काढणार असल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुकाध्य्क्ष दिपक गरु ड यानी सांगितले. (वार्ताहर)तालुक्यातील काही ठिकाणी मोठी बांधकामे टप्प्याटप्प्याने केली जात होती. मात्र आता पाणी नसल्यामुळे बांधकामे बंद आहेत.