शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

आता ५ ट्रॅकवर होणार ड्रायव्हिंग टेस्ट; कार परफेक्ट शिका, नाहीतर 'पर्मनंट लायसन्स' विसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:49 IST

करोडीत होणार अत्याधुनिक 'एडीटीटी' ट्रॅक; सेन्सरच्या मदतीने होणार मूल्यमापन, मानवी हस्तक्षेप संपणार.

- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात गेले आणि एक राउंड मारून पर्मनंट लायसन्स मिळवले, असे आता चालणार नाही. चारचाकी चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता अधिक कठीण होणार आहे. चारचाकीच्या लायसन्ससाठी एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच वेगवेगळ्या ट्रॅकवर कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे ‘जेमतेम ड्रायव्हिंग’ चालणार नाही, तर परफेक्ट ड्रायव्हिंगच आवश्यक राहणार आहे.

आरटीओ कार्यालयाच्या करोडी येथील जागेत ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) होणार आहे. त्यासंदर्भातील आराखडा समोर आला आहे. आरटीओ कार्यालयाकडून सध्या करोडी येथील जागेत पर्मनंट लायसन्ससाठी चाचणी घेतली जाते. मात्र, या ठिकाणी सध्या कोणताही टेस्टिंग ट्रॅक नाही. मातीच्या ट्रॅकवरच दुचाकी, चारचाकी चालवून दाखवावी लागते. मात्र, लवकरच या ठिकाणी अत्याधुनिक असा टेस्टिंग ट्रॅक होणार आहे.

नव्या ट्रॅकवर चारचाकीची कशी होईल टेस्ट?चारचाकी वाहनचालकांसाठी इंग्रजी अंकातील ‘8’ हा ट्रॅक, ‘एच’ ट्रॅक, समांतर पार्किंग ट्रॅक, दोन्ही बाजूंनी वळण घ्यावा लागणारा ट्रॅक आणि चढावर वाहन थांबवून पुन्हा पुढे जाण्याची चाचणी घेणारा ट्रॅक असेल. यातूनच चालकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांची चाचणी घेतली जाईल.

दुचाकीचालकांसाठी वेगळा ट्रॅकदुचाकीचालकांसाठी इंग्रजी अंकातील ‘8’ ला ‘0’ जोडून असलेला ट्रॅक असेल. म्हणजे चालकाला इंग्रजी अंकातील ‘8’ ला वळण घेत पुढे ‘0’लाही वळण घ्यावे लागेल.

सेन्सरची मदतयंत्रावर आधारित, सेन्सरच्या मदतीने ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल. यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय उमेदवाराच्या वाहन चालन कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. चाचणी पूर्ण होताच त्वरित आणि अचूक अहवाल तयार होईल. उमेदवार चाचणीत पास झाला की अनुत्तीर्ण झाला, याची माहिती तत्काळ मिळेल. एकाच वेळी अनेक उमेदवारांची चाचणी घेऊन जलद सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यातून वेटिंग कमी होण्यास मदत होईल.

‘सीआयआरटी’कडून पाहणीॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅकची (एडीटीटी) डिझाइन आणि जागा निश्चित झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टकडून (सीआयआरटी) करोडी येथील जागेची पाहणी करण्यात आली. लवकरच ट्रॅकचे काम सुरू होईल.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Tougher Driving Tests Coming: Five Tracks or License Denied!

Web Summary : Permanent driving licenses will be harder to get. Five tracks test skills. Advanced Driving Testing Track coming to RTO. Expect sensor-based evaluations and instant results, ensuring only skilled drivers pass.
टॅग्स :Driving Licenseड्रायव्हिंग लायसन्सchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRto officeआरटीओ ऑफीस